कंधार : सतत परदेश दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी, व्यापारी, सामान्य जनतेचे प्रश्र सोडवण्यासाठी वेळ देत नाहीत. परदेश दौ-यामुळे मोजकेच दिवस भारतात असणारे पंतप्रधान मोदी हे देशाचे अर्धवेळ पंतप्रधान व पूर्ण वेळ वास्को द गामा असल्याची खरमरीत टीका करीत, सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.कंधार येथे जि.प.हायस्कूल मैदानावर आयोजित संविधान बचाओ, देश बचाओ! किसान, मजदूर, युवक बचाओ! देश बचाओ! अभियानातंर्गत जाहीर सभेत ते बोलते होते. अध्यक्षस्थानी माजी आ.शंकरअण्णा धोंडगे होते. तर आ.बाबाजानी दुराणी, माजी आ. गुरूनाथराव कुरूडे, कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. राजू पाटील, कॉ. अभय टाकसाळ, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.देशातील ज्वलंत प्रश्राकडे दुर्लक्ष करून धर्म व जातीभेदावर भाजपाकडून विशेष भर दिला जात आहे. संविधानाची मूल्ये मोडीत काढली जात आहेत. देशाच्या सीबीआय, रिजर्व्ह बँकेसारख्या संस्था दुबळ्या केल्या जात आहेत. लोकशाही व्यवस्था खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत, देशाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान मोदी मांडत आहेत. मराठा, पटेल, गुर्जर, जाठ, धनगर, मुस्लिम आदीना आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढायचे सोडून एकमेकात दूरावा, भांडणे निर्माण कसे होतील. यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानात धर्मनिरपेक्षता बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र सामाजिक न्याय, समता, बंधुत्व आदी व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. व्याख्यानाला नगरसेवक सुधाकर कांबळे, अ.मन्नान चौधरी, बबर महमंद, पंकज चव्हाण, दिलीप धोंडगे, रा.कॉ.चे बाबुराव केंद्रे, शिवदास धमार्पूरीकर, राजकुमार केकाटे, हब्बूभाई, गौतम पवार, सुरेश कल्हाळीकर, डॉ. गफारखान, संजय केकाटे, आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन व आभार डॉ. सुनील धोंडगे यानी मानले.भाजपाकडून केवळ फसव्या घोषणाविकासाचे स्वप्न दाखवून भाजपाने अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी भावनात्मक मुद्यावर भर दिल्यानेच भाजपा अडचणीत आली आहे. याचाच प्रत्यय पाच राज्यातील निवडणुकीत आल्याचे ते म्हणाले.
सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:16 IST
परदेश दौ-यामुळे मोजकेच दिवस भारतात असणारे पंतप्रधान मोदी हे देशाचे अर्धवेळ पंतप्रधान व पूर्ण वेळ वास्को द गामा असल्याची खरमरीत टीका करीत, सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.
सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी
ठळक मुद्देकंधारमध्ये कन्हैय्याकुमार यांचा हल्लाबोल