शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड, हिंगोली अन् परभणी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; भीतीने नागरिक घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 07:26 IST

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्याने एका घराची भिंत कोसळून संसार उघड्यावर आला

नांदेड/हिंगोली/परभणी: नांदेड , परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांना आज सकाळी ६ वा ५ मिनिट ते  ६ वा २४ मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. दरम्यान, बीड जिह्यातील काही भागांत देखील भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती आहे. अचानक धरणीकंप जाणवल्याने नागरिक भीतीने घराबाहेर पडले.

दरम्यान, या भूकंपाची ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. भूकंपाचा  केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटरवर वरील पांग्रा शिंदे गावात दाखवला जात आहे.

सेलू तालुक्यात धक्कासेलू शहरात आणि तालुक्यात सकाळी सहा वाजून दहा मिनिटाला जवळपास ६ सेकंदाचा सौम्य भूकंपाचा धक्का झाल्याचा  प्रकार घडला आहे. सहा वाजून दहा मिनिटाला खडखड असा आवाज होत जमीन हादरल्याचा प्रकार जवळपास ६ सेकंद सुरू होता. विशेषतः ज्यांची घरे पत्राची आहेत त्यांना मात्र हा प्रकार मोठ्या प्रमाणात लक्षात आल्याने  धावपळ उडाली. काही वेळातच भुकंपाच्या सौम्य धक्याची माहिती सोशलमिडीयावर व्हायरल झाली. तालुक्यातील चिकलठाणा ,देवगांवफाटा या भागात हा सौम्य ६:१२ मि.झाला.

नांदेड शहर, तालुक्याला हादरानांदेड शहर आणि जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांत आज सकाळी ६ वा ८ मि आणि ६ वा १९ मि भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने भितीने नागरिक घराबाहेर पडले. नांदेडच्या 'सिडको-हडको' परिसरात देखील सकाळी ०६:०५ ते ०६:०८ वाजेच्यादरम्यान भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

हिंगोली जिल्ह्यात केंद्रबिंदू, भिंत कोसळलीभूकंपाच्या धक्क्यांची मालिका हिंगोली जिल्हात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. आज सकाळी नागरिकांनी पुन्हा सौम्य धक्का अनुभवला. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवला जात आहे. लोक भयभीत होऊन घराबाहेर पडले आहेत. दरम्यान, दांडेगाव, वारंगा फाटा सह परिसरात पहाटे सहा वाजून पाच मिनिटे, सहा वाजून एकोणवीस मिनिटे आणि सहा वाजून चोवीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. पहिल्या धक्क्यात दांडेगाव येथील मातीच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत. दांडेगाव येथील जंगलबाई जगनसिंग ठाकूर यांच्या घराच्या भिंती कोसळून संसार उघड्यावर आला आहे. भूकंपाच्या तीव्रतेमुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. 

टॅग्स :EarthquakeभूकंपNandedनांदेडparabhaniपरभणीHingoliहिंगोली