शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

एमएचटी-सीईटीच्या तांत्रिक चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, अनेकांचे वर्ष वाया जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 13:24 IST

यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे.

ठळक मुद्देपरीक्षार्थींचा गोंधळ, पूर्वसूचना न देताच केला बदल

- भारत दाढेल

नांदेड : विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पेपर पॅटर्न मध्ये केलेल्या तांत्रिक बदलामुळे एमएचटी सीईटी (MHT-CET ) परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यामुळे महत्त्वाचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सध्या एमएचटी सीईटी परीक्षा सुरू आहे. यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे. पीसीएमबी आणि पीसीबी या दोन ग्रुपसाठी स्वतंत्र साॅफ्टवेअर विकसित करण्यात आले. एकूण १८० मिनिटांसाठी ही परीक्षा होत आहे. त्यात दोन भाग असून फिजिक्स , केमिस्ट्री व मॅथ किंवा बायोलॉजी असे दोन भाग करण्यात आले आहे. मात्र, हे स्वतंत्र भाग असले तरी तसे सॉफ्टवेअर मात्र मानत नाही. एखाद्या विद्यार्थ्यांचा मॅथ हा विषय स्कोअरिंग असेल व त्याने तसा तो पेपर सोडविला तर ९० मिनिटे संपल्यानंतर दुसरा पेपर फिजिक्स, केमिस्ट्रीचा उघडत नाही. त्या विद्यार्थ्यांला या पेपरपासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक परीक्षा यंत्रणेने याबाबत प्रवेश पत्रावर किंवा एमएचटी सीईटीच्या अधिसूचनेत असा कुठेही उल्लेख केलेला नाही. परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यापूर्वी सूचना दिल्या जात आहेत. त्याही स्पष्ट नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे.

सीईटी सेलला जर, फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर पहिल्यांदा सोडविणे अपेक्षित असेल तर, दुसरा पेपर लॉक असायला हवा असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच याबाबतच्या सर्व सूचना निसंदिग्ध असायला हव्या होत्या. विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता केलेला हा बदल विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारा आहे. अनेक विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. याबाबत सीईटी सेलकडे मेलद्वारे तक्रारी केल्या असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सीईटी सेलच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तरी तेथे कोणीही उपलब्ध नसतात. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने दखल घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना दुबार परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी होती.

सीईटी सेलने या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता केलेला बदल हा अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्ही चॉईसप्रमाणे पेपर सोडवू शकत नाही. मॅथसाठी कच्चे काम करावे लागते. त्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे मंडळाने कोणता पेपर आधी सोडवावा, हा चॉईस विद्यार्थ्यांना दिला पाहिजे.-निकेतन उदगीरे, विद्यार्थी, नांदेड

अचानकपणे बदल करणे चुकीचे आहे. मंडळाच्या तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये, मॅथचा पेपर दुसरा असेल व दोन्ही पेपरचे गुण एकत्रित दिले जात असतील तर, पेपरचा क्रम न सांगता अनिवार्य करण्याचे काय प्रयोजन आहे.- यश लोंढे, विद्यार्थी, नांदेड.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद