शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नांदेडात शॉर्टसर्किटनंतर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; दीड किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: January 20, 2024 12:12 IST

स्फोट एवढा भीषण होता की स्टोअर रुमवरील टीनपत्रे तोडून सिलिंडरचा चकनाचूर झाला. 

नांदेड : शॉर्टसर्किट झाल्याने घरातील स्टोअर रुमला आग लागली. या आगीत स्टोअर रुममध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान नांदेड शहरातील सरपंच नगर पाटीजवळ घडली.

सरपंच नगर येथे नरेश दरबस्तवार यांचे घर आहे. घरामध्ये वडील व मुलगा दोघेजण खालच्या रुममध्ये होते. पण सदर आग घराच्या वरच्या मजल्यावर लागल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. स्टोअर रुम तिसऱ्या मजल्यावर असून यामध्ये बैलाचे कासरे व इतर दुकानातील साहित्य ठेवलेले होते. याच ठिकाणी भरलेला सिलिंडरही होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने त्याचा धूर निघून त्यानंतर काही वेळाने त्याचा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की स्टोअर रुमवरील टीनपत्रे तोडून सिलिंडरचा चकनाचूर झाला. 

स्फोटाचा आवाज परिसरात एक ते दीड कि.मी. पर्यंत ऐकायला मिळालाआवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक झोपेतून जागे झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळात अग्नीशमन दलही येथे दाखल झाले. अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. यावेळी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड यांनीही धाव घेत आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.

टॅग्स :Nandedनांदेडfireआग