शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना जाब विचारण्यासाठी ढोल बजावो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:47 IST

चव्हाण यांच्या घरापासून काही अंतरावर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखले

ठळक मुद्देआंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

नांदेड : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. नांदेडमध्ये छावा संघटनेने पालकमंत्री मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना जाब विचारण्यासाठी ढोल बजावो आंदोलन केले. 

आंदोलक चव्हाण यांच्या बंगल्याकडे जात असताना पोलिसांनी त्यांना काही अंतरावर रोखले. या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून छावाचे शेकडो कार्यकर्ते चव्हाण यांच्या बंगल्याच्या परिसरात ठिय्या करत आहेत. 

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पूर्वीपासूनच आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाते. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातही आंदोलकांनी शिवाजीनगर येथील चव्हाण यांच्या बंगल्याच्या कॉर्नरपर्यंत जाऊन ठिय्या केला आणि ढोल वाजवून शासन तसेच उपसमिती अध्यक्ष यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, केंद्रीय कार्यकारिणीचे भीमराव मराठे, अप्पासाहेब कुडेकर यांच्यासह नांदेड चे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे,  माधवराव ताटे, परमेश्वर जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडMaratha Reservationमराठा आरक्षणAshok Chavanअशोक चव्हाण