शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
3
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
4
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
5
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
6
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
7
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
8
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
9
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
10
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
11
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
12
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
13
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
14
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
15
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
16
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
17
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
18
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
19
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

Maratha Kranti Morcha : मराठा आंदोलनाला नांदेडात हिंसक वळण; दगडफेकीत अनेकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 15:00 IST

शहरातील राज कॉर्नर परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर तूफान दगडफेकीस सुरुवात झाली़ यामध्ये महिलांसह अनेकजण जखमी झाले आहेत़ 

नांदेड : सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती़ त्यात नांदेडात या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून शहरातील राज कॉर्नर परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर तूफान दगडफेकीस सुरुवात झाली़ यामध्ये महिलांसह अनेकजण जखमी झाले आहेत़ 

मंगळवारी सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद होत्या़ मराठा समाजातील तरूण दुचाकीवर फिरून नांदेडकरांना प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करीत होते़ सकाळी १२ वाजेच्या सुमारास आयटीआय चौकात तरुणांनी रास्ता रोको केला़ त्यानंतर दुपारी १़३० च्या सुमारास वर्कशॉप कॉर्नर येथे रास्ता रोको करण्यात येत होता़ यावेळी घटनास्थळी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी धाव घेतली़ आंदोलकांना त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला़ त्यासाठी बळाचा वापर करण्यात आला़ 

त्यामध्ये काही आंदोलनकर्ते जखमी झाले़ त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी परिसरात तूफान दगडफेक करण्यास सुरुवात केली़ या दगडफेकीत पोलिस अधीक्षक मिना यांच्या वाहनासह इतर अनेक वाहनांचे नुकसान झाले होते़ अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे परिसरात धावपळ उडाली़ दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानाकडे जाणारे तीनही रस्ते बंद करण्यात आले असून या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे़ त्याचबरोबर आ. हेमंत पाटील यांच्या निवासस्थानीही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनNanded policeनांदेड पोलीस