शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 00:49 IST

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे सोमवार ४ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता सकल मराठा समाजातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. 

- गोविंद टेकाळे

अर्धापूर :   मोठ्या संख्येने मराठे एकत्रित आले आहेत. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे सोमवार ४ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता सकल मराठा समाजातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. 

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. दरम्यान, ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर सोमवार ४ मार्च रोजी विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यासाठी आले होते. त्यानंतर रात्री १०.३० वाजता पिंपळगाव महादेव येथे त्यांची सभा झाली. पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांचा संघर्ष मोठा आहे. आमच्या जिवापेक्षा आम्हाला समाज मोठा आहे. आरक्षण मिळणार असून सरकारकडून सगेसोयऱ्याची  अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही. 

गेल्या सहा महिन्यांपासून लढा सुरू आहे, करोडो मराठ्यांनी पाठिंबा दिला आहे.  आरक्षण मिळाल्यानंतर पहिली सभा पिंपळगाव येथेच होईल, असेही यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित समाज बांधवांना आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.  तब्बल चार तास पिंपळगावकरांनी जरांगे पाटील येण्याची वाट पाहिली.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील