शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
2
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
3
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
4
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
5
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
6
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
7
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
8
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
9
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
10
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
11
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
12
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
13
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
14
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
15
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
16
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
18
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
19
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
20
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती

'मन की बात' मध्ये अर्धापूर तालुक्यातील शिक्षक साधणार पंतप्रधानांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 6:26 PM

Man Ki Baat : तालुक्यातील कारवाडी येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांचा 'मुलांशी गप्पा' हा ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू आहे.

ठळक मुद्दे५ जुलै रोजीच्या 'मन की बात' या कार्यक्रमात सहभाग

अर्धापूर ( नांदेड ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ( दि. २५ ) देशातील निवडक व्यक्तींसोबत 'मन कि बात' या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची इच्छा पूर्ण होत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद चे शिक्षक संतोष राऊत यांनी व्यक्त केली आहे. (  teacher from Ardhapur taluka will interact with the PM Narendra Modi ) 

तालुक्यातील कारवाडी येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांचा 'मुलांशी गप्पा' हा ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होत कोरोना काळात शाळा बंद असताना अध्ययन करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. विना दप्तराची शाळा, बांधावरील शाळा आदी २८ उपक्रम, मुलांशी गप्पा आदी उपक्रम राबविले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची संधी मिळू शकते, असा असा मेसेज 'माय गव्हर्मेंट' यांच्याकडून शिक्षक संतोष राऊत यांना दि.१७ रोजी आला. त्यांनी कामाची माहिती 'माय गव्हर्मेंट'कडे पाठवली. २५ जुलै रोजीच्या 'मन की बात' या कार्यक्रमात त्यांना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधता येतील असा मेसेज पंतप्रधान कार्यालयातून आल्याची माहिती राऊत यांनी दिली. 

कोरोना काळात ऑनलाइन माध्यमातून गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देण्याचे संतोष राऊत यांचे कार्य उल्लेखनीय आहे.- रुस्तुम ससाने, गटशिक्षण अधिकारी अर्धापुर

टॅग्स :Teacherशिक्षकMan ki Baatमन की बातNandedनांदेडprime ministerपंतप्रधान