शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तशिखराचा आधारवड कोसळला! महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन, माहूरवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:48 IST

५ व्या वर्षी संस्थानात आगमन ते ३० वे महंत; मधुसूदन भारती महाराजांचा प्रेरणादायी प्रवास संपला.

माहूर (जि. नांदेड): नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूर गडावरील दत्तशिखर संस्थानचे ३० वे महंत प.पू. मधुसूदन भारती महाराज यांचे ४ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वारकरी आणि दत्त संप्रदायावर शोककळा पसरली आहे. ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता दत्तशिखर परिसरात हजारो भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अध्यत्माचा प्रदीर्घ प्रवासअहिल्यानगर येथे जन्मलेले मधुसूदन भारती महाराज वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी दत्तशिखर संस्थानात आले होते. १९७८ मध्ये प.पू. महंत गुरू अच्युत भारती महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची ३० व्या महंतपदी नियुक्ती झाली. तब्बल ४८ वर्षे त्यांनी या संस्थानची धुरा सांभाळत दत्तप्रभूंची सेवा आणि आध्यात्मिक परंपरा जोपासली. त्यांच्या निधनानिमित्त माहूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नवे उत्तराधिकारी घोषितसंस्थानच्या परंपरेनुसार, महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी ईश्वर चिठ्ठीद्वारे नवीन महंतांची निवड करण्यात आली. यात प.पू. योगी शामभारती महाराज यांची दत्तशिखर संस्थानचे ३१ वे महंत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर मधुसूदन भारती महाराजांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.

प्रशासकीय नियोजनभक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता माहूर आगाराकडून ४० जादा बसेसची सोय करण्यात आली होती. तहसीलदार अभिजित जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दत्तनगर येथे भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahur's Datta Shikhar Loses Spiritual Leader, Madhusudan Bharati Passes Away

Web Summary : Mahant Madhusudan Bharati Maharaj of Datta Shikhar Sansthan, Mahur, passed away at 30. He served for 48 years. Yogi Shambharati Maharaj is the new successor. Thousands attended the funeral.
टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यू