‘महावितरण’ने विविध पातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:18 AM2021-05-11T04:18:46+5:302021-05-11T04:18:46+5:30

सरसमसह इतर युनिटमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात मोठे अडथळे होते. त्यात ३३ केव्ही सरसमची जी लाईन हिमायतनगरहून येते ती ब्रेकडाऊन ...

‘Mahavitaran’ worked at various levels to ensure smooth power supply | ‘महावितरण’ने विविध पातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत

‘महावितरण’ने विविध पातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत

Next

सरसमसह इतर युनिटमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात मोठे अडथळे होते. त्यात ३३ केव्ही सरसमची जी लाईन हिमायतनगरहून येते ती ब्रेकडाऊन झाली होती. आंदेगाव येथे झाडे उन्मळून पडली होती. खांबही पडले होते. सोनारी फाटा ते जवळगाव या दरम्यान काम करून तामशाहून येणारी ३३ केव्ही लाईन दुरुस्त करण्यात आली. सरसम आणि पोटा उपकेंद्र सुरू करण्यात आले. तामशाच्या लाईनवर अधिक भार आल्याने सरसम ३३ केव्ही लाईन चालू करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि हिमायतनगर ते सरसम लाईनवरचे दोन मोठे इन्सुलेटर जळालेले होते. ते बदलून हिमायतनगर ते सरसम लाईन चालू करण्यात आली. त्यानंतर सरसम ते पोटा या लाईनवर पडलेली दोन झाडे काढून दोन इन्सुलेटर बदलण्यात आले. या लाईनवरील फाॅल्ट शोधण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सरसम ते पोटा पाई गेले. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक खांबाची तपासणी केली तेव्हा कुठे फाॅल्ट सापडला. आंदेगाव लाईनवर दोन इन्सुलेटर, एक एलए आणि पडलेली चार ती पाच झाडे काढून त्यातील फाॅल्ट शोधण्यात आला. हा फाॅल्ट इतका किचकट होता की, रात्र झाल्यावरच तो चमकला म्हणूनच कळाला आणि खूप प्रयत्न करून रात्री साडेआठ वाजता तिन्ही सबस्टेशन चालू झाली. त्यानंतर समोरील ११ केव्ही, गावठाण फिडर आणि शेतीच्या फिडरवर जवळपास १५ ते १७ इन्सुलेटर वीज पडल्याने जळाले होते. ते सर्व पोटाकडे बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. आंदेगाव येथे एक लोखंडी पोल वाकून तुटला होता आणि ५ ते ६ गळ्याचे कंडक्टर तुटलेले जोडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, अशी माहिती लोणे यांनी दिली. ‘महावितरण’ची सर्व टीम कामाला लागल्याने आठ दिवसांचे काम केवळ दीड दिवसांत झाल्याचे लोणे म्हणाले.

Web Title: ‘Mahavitaran’ worked at various levels to ensure smooth power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.