शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात महावितरणच्या सहा कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:18 IST

मार्चअखेर असल्याने महावितरणच्या वतीने वीजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र या वसुली मोहिमेस गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत

ठळक मुद्देवीज ग्राहकांचा रोष वीजबिलात वारंवार होताहेत चुका

नांदेड : मार्चअखेर असल्याने महावितरणच्या वतीने वीजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र या वसुली मोहिमेस गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून महिनाभरात जवळपास सहा अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे़ यास महावितरणकडून चुकीचे आणि अवास्तव बिल देण्याचा रोष अधिक कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे़अर्धापूर तालुक्यातील मेंढला बुद्रुक येथे २८ मार्च रोजी वीजबिल वसुली करत असताना दत्ता गणपती भरकड याने अर्धापूर शाखेतील तंत्रज्ञ मंगेश बोईनवाड यास शिवीगाळ करत जबर मारहाण केली. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार अर्धापूर शाखा कार्यालयाअंतर्गत येणाºया मेंढला बुद्रुक या गावामध्ये तंत्रज्ञ मंगेश बोईनवाड हे आपल्या दोन सहकारी कर्मचाºयांसोबत २८ मार्च रोजी सकाळी वसुली करत असताना कसली वसुली? कशाची वसुली? असे प्रश्न विचारत दत्ता गणपती भरकड याने मंगेश बोईनवाड यांना मारहाण केली़ वेळीच इतर ग्रामस्थांनी सोडवासोडव केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी अर्धापूर ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मार्च महिन्यात मारहाण झाल्याची ही सहावी घटना आहे.नांदेड शहरात १४ मार्च रोजी शिवाजीनगर परिसरातील महावितरण कार्यालयात जनमित्र राजरत्न हनुमंते यांना नगरसेवक राजू यन्नम यांच्याकडून मारहाण झाली होती़ तसेच किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे ११ मार्च रोजी शेख आक्रम शेख सरदार या वीज ग्राहकाने वसुली मोहिमेसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंता सुरेश गंधे व अन्य दोन लाईनमनला मारहाण केली़नायगाव उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता महेश गट्टुवार यांना ७ मार्च रोजी मारहाण झाली होती़ सदर घटना घडत असतानादेखील पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करीत नसल्याचे असे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी महावितरण कर्मचारी करीत आहेत़ परंतु, वीजग्राहकांचा रोष कशामुळे बळावत आहे, याचा शोध घेण्याचे कष्ट अधिकारी घ्यायला तयार नाहीत़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीelectricityवीज