शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नांदेड जिल्ह्यात महिला मतदार ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 20:41 IST

सर्वाधिक दीड लाख महिला मतदार नांदेड उत्तर मतदारसंघात

- अनुराग पोवळे

नांदेड : जिल्ह्यातील नऊ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी तीन दिवसांपासून सुरु असून पदयात्रा, कॉर्नर बैठका आणि मतदारांच्या थेट भेटी उमेदवारांकडून घेतल्या जात आहेत. या निवडणुकीत महिला मतदारांची निर्णायक भूमिका राहणार असून तब्बल १२ लाख २४ हजार महिला मतदार या नऊ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी निवडण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. 

जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २५ लाख ४२ हजार ४५० इतकी आहे. त्यात सर्वाधिक मतदार हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आहेत. येथे ३ लाख ११ हजार ९६८ मतदार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या १ लाख ५० हजार २६५ इतकी आहे. किनवट मतदारसंघात सर्वात कमी १ लाख २५ हजार ६८२ महिला मतदार आहेत. या ठिकाणी १ लाख ३३ हजार ५८२ पुरुष मतदार आहेत. हदगावमध्येही महिला मतदारांचे प्रमाण उल्लेखणीय आहे. येथे १ लाख ३२ हजार ८१० महिला मतदार आहेत. 

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातही २ लाख ९१ हजार ४७४ एकूण मतदानापैकी १ लाख ४० हजार ९८१ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रंगतदार सामना ठरत असलेल्या नांदेड दक्षिणमध्येही २ लाख ८४ हजार ११४ एकूण मतदारामध्ये १ लाख ३७ हजार १२७  तर १ लाख ४६ हजार ९८७ महिला मतदार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या भोकर मतदारसंघातही १ लाख ३४ हजार ७३६ महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नायगाव मतदारसंघात १ लाख ३६ हजार ४०८, लोहा मतदारसंघात १ लाख २१ हजार ७५८ आणि मुखेड मतदारसंघात १ लाख ३४ हजार १६९ महिला मतदार आहेत. 

जिल्ह्यात असलेल्या २५ लाख ४२ हजार ४५० मतदारांपैकी १२ लाख २४ हजार महिला आहेत. महिला मतदारांची मते मिळविण्यासाठी उमेदवार प्रचारादरम्यान थेट घरोघरी पोहोचत आहेत. त्यात ज्येष्ठ महिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी मतदार चरणस्पर्शही करीत आहेत.  महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्याची माहिती उमेदवार देत आहेत. तर आणखी नव्या योजना सुरु करण्याचे आश्वासनही महिला मतदारांना उमेदवारांकडून प्रचारादरम्यान दिल्या जात  आहे.

नऊ मतदार संघातून आठ जणीच रिंगणातविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात एकूण आठ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यात चार महिला उमेदवार पक्षाकडून तर चार महिला उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सेनेच्या राजश्री पाटील या प्रमुख उमेदवार आहेत. त्याचवेळी दक्षिणमध्ये पंचफुला चंद्रकांत तारु आणि नय्यरजहा महमद फेरोज हुसेन यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. नायगाव मतदारसंघात भारत प्रभात पार्टीकडून वर्षाराणी बाबूराव नामवाड, देगलूर मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून सावित्रीबाई श्रीहरी कांबळे आणि विमल बाबूराव वाघमारे या नॅशनल सोशालिस्ट पार्टी (यु) कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NandedनांदेडVotingमतदान