शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

'अशोकराव राहुल गांधींना भोकरला आणा'; त्यांच्या प्रचाराने मत कमी पडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 20:26 IST

प्रतापराव तुम्ही जॉईंट किलर झालात आता बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे पुढचे जॉईंट किलर बनतील

ठळक मुद्दे नांदेडच्या मतदारांनी चव्हाण यांना लोकसभेत घरी बसवले

मुदखेड :राहुल गांधी जिथे जिथे प्रचाराला जातात तिथे काँग्रेसचे मतदान कमी होते हा इतिहास आहे. त्यामुळे माझी अशोकरावांना विनंती आहे की त्यांनी राहुल गांधी यांना प्रचारासाठी भोकरला आणावे अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. मुख्यमंत्री बारड येथील प्रचारसभेत बोलत होते. 

भाजपचे उमेदवार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रचारासाठी मुदखेड तालुक्यातील बारड येथे मुख्यमंत्र्याच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आल होत. या प्रचारसभेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यानी स्वर्गीय साहेबराव बारडकर यांची विशेष आठवण काढली. बारडकर यांनी २५ वर्ष केलेल्या सेवेचा त्यांनी विशेष उल्लेख केला यावेळी बोलतांनी मुख्यमंत्री फडवणीस यांनी राहुल गांधीवर टीका केली. राहुल गांधी काल मुंबईत म्हणाले की, सत्तर वर्षात देशाचा विकास झाला नाही पण गांधी हे विसरले की या सत्तर पैकी साठ वर्ष काँग्रेसचीच सत्ता होती. ते अश्या पद्धतीने बोलल्याने उमेदवारांचे चेहरे पडले होते असा उल्लेख मुख्यमंत्री यांनी केला. 

राहुल गांधी जिथं जिथं प्रचाराला जातात तिथे काँग्रेसचे मतदान घटत असते त्यामुळे अशोकरावांना विनंती आहे की त्यांनी राहुल गांधीला भोकरला प्रचारासाठी आणावे. नांदेडच्या मतदारांनी चव्हाण यांना लोकसभेत घरी बसवले, त्यामुळे मला वाटलं की ते आता पुढच्या लोकसभेची तयारी करतील, पण ते विधानसभेला मैदानात उतरले , प्रतापराव तुम्ही जॉईंट किलर झालात आता बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे पुढचे जॉईंट किलर बनतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

५ वर्षात १५ वर्षापेक्षा जास्त काम या भागाच्या विकासासाठी बापूसाहेबांना निवडून द्या पुढच्या 3 महिन्यात चकचकित रस्ते बनवतो अस आश्वासन त्यांनी दिलय. काँग्रेसच्या 15 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा आम्ही पाच वर्षात जास्त कामे केली असा दावा त्यांनी या सभेत बोलताना केला. आपल्या भाषणात त्यांच्या सरकारच्या कामांचा पाढाच मुख्यमंत्र्यानी वाचला. कलम 370 वरही ते बोलले. दरम्यान बारड इथल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.

आजचा आणि उद्याचा मुख्यमंत्री प्रतापराव पाटील यांनी आठवण करून दिल्यानंतर मुख्यमंत्री फडवणीस यांनी या भागाचे पाणी कुठेही जाऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले. आजचा आणि उद्याचा मुख्यमंत्री म्हणून मी हा शब्द देत असल्याचे ते भाषणाच्या शेवटी म्हणाले. अशोक चव्हाण यांना इथल्या लोकांनी दोन वेळा मुख्यमंत्री केले पण मराठवाड्यात पाणी आणण्याच काम त्यांनी केले नाही, अशी टीकाही मुख्यमंत्री फडवणीस यांनी याच सभेत केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhokar-acभोकरAshok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस