नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; सकाळी बंद, दुपारी बाजारपेठ सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 04:37 PM2021-10-11T16:37:09+5:302021-10-11T16:41:50+5:30

Maharashtra Bandh : सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते.

Maharashtra Bandh : composite response in Nanded; Closed in the morning, market resumed in the afternoon | नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; सकाळी बंद, दुपारी बाजारपेठ सुरु

नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; सकाळी बंद, दुपारी बाजारपेठ सुरु

Next

नांदेड: महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला नांदेडमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात दुकाने बंद ठेवलेल्या व्यापाऱ्यांनी नंतर सर्व दुकानं उघडली. 

सणासुदीच्या काळात बंद परवडणारा नसल्याचे  व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. आधीच कोरोनामुळे तोट्यात गेलेला व्यवसाय आता सावरत असताना बंद नको अशी भूमिका व्यापारी मंडळींनी घेतल्याचे दिसून आलय. त्यामुळे बंदचा फारसा प्रभाव नांदेडमध्ये दिसून आला नाही. 

सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. आय टी आय चौक येथे ही बराचवेळ तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते थांबले होते. दुपारी एक वाजेनंतर मात्र सर्व व्यवहार सुरू झाले होते.

Web Title: Maharashtra Bandh : composite response in Nanded; Closed in the morning, market resumed in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.