शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेकडून राजश्री पाटील, कल्याणकर या नवख्या उमेदवारांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:36 IST

सेनेच्या पाचपैकी चार जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली

ठळक मुद्देलोहा-कंधारचे चित्र मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही़

नांदेड : जिल्ह्यात युतीच्या फॉर्मुल्यानुसार सेनेच्या पाचपैकी चार जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे़ नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील, नांदेड उत्तर बालाजी पाटील कल्याणकर, देगलूर सुभाष साबणे तर हदगाव मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे़ तर लोहा-कंधारचे चित्र मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही़ यामध्ये राजश्री पाटील आणि बालाजी कल्याणकर हे दोघेही नवखे उमेदवार आहेत़ 

सेनेच्या पहिल्या यादीत राजश्री पाटील, सुभाष साबणे आणि नागेश पाटील आष्टीकर यांची नावे होती़ त्यानंतर नांदेड उत्तरमधून कोण? याबाबत उत्सुकता होती़ मंगळवारी दुपारपासूनच सेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर ठाण मांडून होते़ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर यांचे नाव समोर आले़ उत्तरमधून अनेक जण इच्छुक होते़ परंतु महापालिकेत सेनेचे एकमेव नगरसेवक असलेल्या कल्याणकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली़ तर नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसकडून डी़पी़सावंत, वंचितचे मुकुंद चावरे, देगलूरमध्ये रावसाहेब पाटील अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार असतील़ तर  वंचितचे रामचंद्र भरांडे हे ही या ठिकाणी नशीब आजमावत आहेत़ नांदेड दक्षिणमध्ये वंचितकडून फारुख अहमद हे रिंगणात उतरले आहेत़ 

सेना-भाजपात जिल्ह्यात लोहा मतदारसंघावरुन निर्माण झालेला तिढा न सुटल्यास या मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून प्रणिता देवरे-चिखलीकर यांना उमेदवारी देण्याची मागणी चिखलीकर समर्थकांनी केली आहे. तर दुसरीकडे भाजपाचेच दिलीप कंदकुर्ते, डॉ. संतुकराव हंबर्डे यांनीही बंडाचे निशाण फडकाविले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणते बदल होतील, याकडेही लक्ष लागले आहे. ४ आॅक्टोबरनंतरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

मुखेडात रामदास पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षविधानसभा मतदारसंघातून भाजपातर्फे रामदास पाटील यांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता़ पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी मुखेडमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी करीत पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतली होती़ मात्र मुखेडमधून विद्यमान आ़तुषार राठोड यांची उमेदवारी जाहीर झाली़ दरम्यान, रामदास पाटील यांनी मुखेड मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह कायम आहे़ एका प्रमुख पक्षानेही पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी विचारणा केल्याने रामदास पाटील आता काय निर्णय घेतात़ याकडे मुखेडकरांचे लक्ष लागले आहे़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NandedनांदेडShiv Senaशिवसेना