‘लोकमत कॅम्पस चॅम्प्स २०२१ स्पर्धा’ जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धात्मक कार्यक्रमांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:28+5:302021-03-06T04:17:28+5:30

लोकमत बालविकास मंच व कॅम्पस क्लब यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विविध स्पर्धा, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले ...

‘Lokmat Campus Champs 2021 Competition’ A series of district, state level competitive events | ‘लोकमत कॅम्पस चॅम्प्स २०२१ स्पर्धा’ जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धात्मक कार्यक्रमांची मालिका

‘लोकमत कॅम्पस चॅम्प्स २०२१ स्पर्धा’ जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धात्मक कार्यक्रमांची मालिका

Next

लोकमत बालविकास मंच व कॅम्पस क्लब यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विविध स्पर्धा, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक शाळेने ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, अशा परिस्थितीत मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केले जाणारे स्नेहसंमेलन यावर्षी होणे जरा कठीणच आहे, म्हणूनच अशा शालेय विद्यार्थ्यांना ‘लोकमत कॅम्पस चॅम्प्स २०२१’ स्पर्धा ही एक पर्वणीच असणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे गिफ्ट पार्टनर म्हणून नांदेड शहरातील ‘लक्ष्मी परिधान’ यांचे सहकार्य लाभले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे जिंकावीत, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -लोकमत कार्यालय, व्हीआयपी रोड, नांदेड. मो. नं. ८६६८९०२७२६.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा : (पूर्व प्राथमिक व प्राथमिक), पूर्व प्राथमिक (Pre Primary) विद्यार्थ्यांनी फळ आणि भाज्यांशी निगडित वेशभूषा करायची आहे. प्राथमिक वर्गातील (Primary) विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा करायची आहे. वेशभूषेशी निगडित माहितीसह १ ते २ मिनिटांचा व्हिडिओ आम्हाला पाठवा.

सोलो डान्स स्पर्धा : (प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांकरिता), कोणत्याही हिंदी, मराठी, बॉलिवूड, हॉलिवूड गाण्यावरती नृत्य सादर करू शकता, नृत्याचा १ ते २ मिनिटांचा व्हिडिओ आम्हाला पाठवा.

गायन आणि वादन : (प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांकरिता), कोणतेही गाणे किंवा वाद्य तुम्ही निवडू शकता. कोणत्याही गाण्याचा किंवा वाद्य वाजवतानाचा १ ते २ मिनिटांचा व्हिडिओ आम्हाला पाठवा.

निबंध स्पर्धा : (प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांकरिता), - पहिली ते तिसरी - माझे स्वप्न आणि ते मी कसं पूर्ण करणार?

चौथी व पाचवी - सध्याच्या महामारीमुळे काय शिकलो?

सहावी व सातवी - तुमच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग

आठवी ते दहावी - शहरीकरणामुळे वाढलेले प्रदूषण

निबंध लिहून त्याचा फोटो आम्हाला पाठवा

वक्तृत्व स्पर्धा : (प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांकरिता )

पहिली ते तिसरी - माझे शालेय जीवन

चौथी व पाचवी - पर्यावरण वाचवा

सहावी व सातवी - जागतिक तापमानवाढ

आठवी ते दहावी - कृत्रिम बुद्धिमत्ता - भविष्यवेध

१ ते २ मिनिटांचा व्हिडिओ आम्हाला पाठवा.

एकपात्री अभिनय (शेक्सपिअर मोनोलॉग): (फक्त माध्यमिक विद्यार्थ्यांकरिता), स्पर्धकांनी शेक्सपिअरच्या कोणत्याही एकपात्री प्रयोगातील १ प्रयोग करून त्याचा २ मिनिटांचा व्हिडिओ आम्हाला पाठवावा.

नावनोंदणी करण्यासाठी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/campuschampnnd या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. १० मार्चपर्यंत असून प्राथमिक फेरी १२ मार्चला होईल.

राज्यस्तरावर होणारी ऑनलाइन फेरी १५ मार्चला होणार असून राज्यस्तरीय निकाल २० मार्चला घोषित होईल.

ज्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे शक्य नाही, ते लोकमत कार्यालय येथे येऊन नोंदणी करू शकतात. प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तीनपेक्षा अधिक स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, त्यांना एकूण शुल्कात १५ टक्के सवलत दिली जाईल.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे मार्च महिन्यात जाहीर केली जातील, तसेच ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होतील.

स्पर्धेसाठी तयार केलेले व्हिडिओ आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, शहर, मोबाइल नंबर, स्पर्धा, विषय आदी माहितीसह ८८०५११६२६३ या क्रमांकावर व्हाॅट्सॲप करावे किंवा bvmlokmatnanded@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावे.

Web Title: ‘Lokmat Campus Champs 2021 Competition’ A series of district, state level competitive events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.