शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : विद्यार्थी पत्राद्वारे आई-बाबांना करणार मतदान करण्याचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:34 IST

नांदेडमध्ये निवडणूक विभागाचे संकल्पपत्र अभियान 

नांदेड : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने व्यापक जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत येत्या मंगळवारपासून शाळांमध्ये संकल्पपत्र अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत विद्यार्थी आपल्या आई-बाबा, दादा, ताईसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांना पत्र लिहून मतदान करण्याची विनंती करीत आहेत. 

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या स्वीप मतदार जागृती अभियानातंर्गत मतदानासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून शहरातील नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानास मंगळवारपासून प्रारंभ केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन सहायक निवडणूक अधिकारी अनुराधा ढालकरी, लतीफ पठाण, शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, तहसीलदार किरण अंबेकर आदींनी केले आहे.

गोड सल्लानांदेड तालुक्यातील सर्व विद्यार्थी आपल्या आईबाबा, मामा-मामी, काका-काकी, दादा, ताई इतर नातेवाईकांना तसेच शेजाऱ्यांना येत्या १८ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आवाहन पोस्टकार्डद्वारे करणार आहेत. या संकल्पपत्रात मतदानाचे महत्त्व व गरजही हे विद्यार्थी विशद करणार असून, मतदान हे पवित्र कार्य आहे. अगोदर मतदान करा आणि त्यानंतर इतर कामे करा, असा गोड सल्लाही ते देणार आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगStudentविद्यार्थी