शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

नांदेड जिल्ह्यात २३ हजार शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:54 IST

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : ग्रीन लीस्टमध्ये नाव येण्याची शेतकयांना प्रतीक्षा

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकºयांची कर्जमाफी केली़ परंतु, या निर्णयाला पाच महिने उलटले तरी अद्याप प्रत्यक्षात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला हे कोणालाही सांगता येत नाही़ आजपर्यंत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत़ दरम्यान, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त आकडेवारीवरून पंधरा तालुक्यांतील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकरी पात्र ठरले आहेत़ ही यादी कर्जमाफीच्या संकेतस्थळावर ग्रीन लिस्टमध्ये आहे़ तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची कर्जमाफी त्रुटी आणि तांत्रिक प्रक्रियेमध्ये अडकली आहे़ग्रीन लिस्टप्रमाणे जिल्ह्यातील कर्जमाफी लाभार्थीसंख्या पुढीलप्रमाणे- नांदेड तालुक्यातील ६५ गावांतील १७८२, कंधार ११९ गावांतील १३६०, लोहा तालुक्यातील ९६ गांवातील १३८५, मुखेड १२७ गावांतील ५९४६, देगलूर-९१ गावांतील ७२४, बिलोली- ७५ गावांतील १ हजार ८६ शेतकरी, नायगाव तालुक्यात ८१ गावांतील १ हजार ९५, हदगाव तालुक्यातील ११५ गावांतील ३ हजार ५६२, अर्धापूर तालुक्यात ४० गावांतील ८९३, मुदखेड - ५३ गावांचे ३९९, भोकर ७२ गावांतील १०६५, उमरी- ६० गावांतील ५९, किनवट - १३३ गावांतील ८४९, माहूर ६४ गावांतील ८९९ तर हिमायतनगर तालुक्यातील ५६ गावांतील २ हजार ७५ असे एकूण २३ हजार १७९ शेतकरी पहिल्या यादीत पात्र ठरले तर धर्माबाद तालुक्याची माहिती उपलब्ध झाली नाही़चार बँकांचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूरस्टेट बँक आॅफ इंडियाच्या ४ हजार ६७२ शेतकरी खातेदारांचे ३३ कोटी ३० लाख रूपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४ हजार २८२ खातेदारांचे २७ कोटी ७४ लाख, आंध्र बँकेच्या ४ खातेदारांचे ७ लाख तर पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या १२ खातेदारांचे १३ लाख असे एकूण ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूर झाल्याचे लीड बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांनी सांगितले़ यात बहुतांश शेतकºयांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे़ उर्वरित शेतकºयांचीदेखील लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले़४सरसकट कर्जमाफी निर्णयानंतर शासनाने आठ ते नऊ जीआर काढले़ यातून शासनाला कमीत कमी शेतकºयांना लाभ द्यायचा हे स्पष्ट होते़ नवीन कर्ज बंद पडले, त्यामुळे पेरणी, उत्पन्न घटणार, यातून आर्थिक कोंडी होवून पुन्हा शेतकरी अडचणीत सापडणार आहे़ कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होण्यास जेवढा विलंब लागेल, तेवढा परिणाम सरकारला भोगावा लागेल़ - शंकर अण्णा धोंडगे, शेतकरी नेते़