शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ३३ वर्षांपासून रखडलेला नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 19:45 IST

स्वेच्छा पुनर्वसन योजना प्रकल्पग्रस्तांना मान्य

ठळक मुद्दे२०३३ कोटींची प्रशासकीय मान्यता २६९२४  हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली 

नांदेड : मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित असलेल्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणावरील आंतरराज्य जलप्रकल्पास शासनाने चौथ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. आता या प्रकल्पावर २०३३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

लेंडी प्रकल्प सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पामुळे मुखेड व देगलूर तालुक्यातील अनेक गावे सिंचनाखाली येतील.लेंडी धरणास तब्बल ३३ वर्षांपूर्वी प्रथम मान्यता देण्यात आली होती. त्यावेळेस या प्रकल्पाची किंमत ५४ कोटी होती. या धरणाच्या माध्यमातून २६९२४  हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. भूसंपादन व इतर कामांसाठी आतापर्यंत या प्रकल्पावर ५०४ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. यामध्ये ७० टक्के माती बांधकाम पूर्ण करण्यात आले. दगडी सांडव्याचे काम ७५ टक्के पूर्ण, १४ पैकी १० वक्राकारद्वारे उभारणीसह पूर्ण, कालव्याचे सुमारे ४५ ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या धरणाच्या परिपूर्णतेसाठी २९६१ हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक असून त्यातील बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे. केवळ ६२.९२ हेक्टर जमीन संपादनाचे काम बाकी असून यावर १०७ कोटी रुपये निधी गरजेचा आहे. या धरणामध्ये बुडीत होणाऱ्या गावामध्ये स्वेच्छा पुनर्वसन प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आला असून त्यास आता शासनाने मान्यता दिली आहे.

स्वेच्छा पुनर्वसन योजना प्रकल्पग्रस्तांना मान्यमुक्रमाबाद गावातील पुनर्वसनाचे काम रखडले होते. या गावातील १३१० घरांचा अंतिम मावेजा प्रलंबित असून एकरकमी अनुदान उपलब्ध होत नसल्यामुळे मागील सात वर्षांपासून गावकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले होते.च्परंतु आता प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन योजना मान्य केली आहे व जलसंपदामंत्र्यांनी यासाठी स्वतंत्र ९३.२४ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

लेंडीसह इतर जलप्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू होता. मान्यता मिळालेल्या २०३३ कोटींपैकी काही रकमेची तरतूद आगामी अर्थसंकल्पात अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड 

टॅग्स :Lendi Lakeलेंडी तलावNandedनांदेडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAshok Chavanअशोक चव्हाण