शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सावळीची पाणीयोजना अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:56 IST

तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़

ठळक मुद्दे१ कोटी ६२ लाखांची योजना, सप्टेंबरअखेर होणार पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़दुष्काळजन्य परिस्थितीत येथे टँकरनेही पाणीपुरवठा करण्याची वेळ येत होती़ गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत होता़ गावाची कायम टंचाई दूर करण्यासाठी गाव पातळीवर पाणीपुरवठा समिती करण्यात आली़ गावकऱ्यांनी नागनाथ पाटील नागराळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड केली़ सन २०१५ च्या काळात तत्कालीन सरपंच सविता पाटील यांच्या उपस्थितीत ठराव घेऊन नवीन अद्ययावत पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न सुरू झाले़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सर्व अंदाजपत्रक तयार होऊन गोदावरी पात्रातून पाणीपुरवठ्यासाठी सर्वेक्षण झाले़सात किलोमीटर मुख्य पाईपलाईनसावळी गावासाठी गुजरी स्थित गोदावरी नदी पात्रातून सात किलोमीटर मुख्य पाईपलाईन टाकण्यात येत आहे़ गावात एक लाख ७५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले़ गोदा पात्रात भूमिगत विहीर खोदण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पाणी लागले आहे़ १०० टक्के अनुदान असलेल्या या योजनेतून गावात लहान पाईपलाईन करण्यात येणार आहे़ सध्या शेतीची कामे नसल्यामुळे मुख्य मोठी पाईपलाईनचे काम गुजरी ते सावळी करण्यात येत आहे़ इलेक्ट्रिक मोटार, पंप हाऊस, वॉचमन, विद्युत रोहित्र आदींचे या योजनेत प्रावधान आहे़ जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या देखरेखखाली काम जोरात सुरू आहेग़्रामपंचायत व पाणीपुरवठा समितीच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सरपंच सुनीता आरसे यांच्या काळात केंद्राकडून प्रशासकीय मान्यता मिळाली व अनुदान मंजूर झाले़ गाव पातळीवरची मूलभूत पाणीपुरवठा समस्या असल्याने गावकºयांनी अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून योजनेसाठी प्रयत्न चालवले़ केंद्र सरकारकडून प्रभावी पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ होय़केंद्राच्या प्रभावी योजनेमुळे पाणीटंचाई संपुष्टात येईल -नागनाथ पाटील सावळीकर, सरपंच, सावळी़सावळी ग्रा.पं.नेपाणीपुरवठा समिती स्थापन करून ही मुलभूत समस्या दूर केली- आबाराव संगनोड, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान समिती, सावळी़योजनेसाठी सतत पाठपुरावा केला़ योजनेची व्याप्ती मोठी असल्याने गावात पाणी समस्या राहणार नाही -गंगाधर आरसे, माजी सरपंचकामाची प्रगती पाहता दिवाळीपूर्वी गावकºयांना पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे़ केंद्राकडे राज्य शासनाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न कामी आले - शेख जानेमियाँ, माजी उपसरपंच, सावळी़

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाईfundsनिधी