शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नगराध्यक्षपदी कुलकर्णी , अडसूळ

By admin | Updated: July 9, 2014 00:11 IST

हदगाव/धर्माबाद : हदगाव पालिकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे अमित अडसूळ आणि धर्माबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विनायकराव कुलकर्णी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले.

हदगाव/धर्माबाद : हदगाव पालिकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे अमित अडसूळ आणि धर्माबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विनायकराव कुलकर्णी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. दरम्यान, अर्धापूरनगरपंचायतमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.धर्माबादेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ८ जुलै रोजी माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या सत्तेत सतत साडेचार वर्षात चौथ्यांदा नगराध्यक्षपद रत्नाळीकडे गेल्याने बाळापूरवासियांत नाराजी व्यक्त होत आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे १५ आणि कॉंग्रेसचे तीन असे पक्षीय बलाबल आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण धरमकर, मुख्याधिकारी निलेश सुंकावार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. हदगाव : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदी विद्यमान गटनेते अमित अडसूळ यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र ८ जुलै रोजी स्पष्ट झाले. १४ जुलै रोजी नगराध्यक्षपदाची औपचारिक घोषणा होईल. नगराध्यक्षपदासाठी मंगलाताई मुधोळकर, अमित अडसूळ यांच्या नावाची चर्चा होती. शेवटच्या टप्प्यात माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव देशमुख यांचेही नाव चर्चेत आले. यात अमित अडसूळ यांनी बाजी मारली, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले. पीठासन अधिकारी म्हणून भोकरचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके व तहसीलदार संतोष गोरड यांनी काम पाहिले. १४ जुलै रोजीच पालिका उपाध्यक्षपदाचीही घोषणा होईल. दरम्यान, अडसूळ यांचे नामननिर्देशनपत्र दाखल करताना युवक काँग्रेसचे केदार पाटील - साळुंके, बाबूराव पाथरडकर, जाकेर चाऊस, अनिल पाटील, सुनील सोनुले, खदीर खॉं, सुहास शिंदे, अहेमद पटेल, आनंद कांबळे, बाबूअण्णा पिचकेवार आदीही उपस्थित होते.(वार्ताहर)अर्धापूरला नगराध्यक्षपदासाठी चुरसअर्धापूर: येथील नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून नासेरखान पठाण तर राष्ट्रवादीकडून प्रकाश सरोदे यांचा अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण होणार आहे.पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. कॉंग्रेस १४ व राष्ट्रवादीचे ३ असे पक्षीय बलाबल नगरपंचायतमध्ये आहे. वरच्या स्तरावर राष्ट्रवादी व कॉंग्रेसची आघाडी असताना पूवीरच्या अडीच वर्षांत कॉंग्रेसच्या हाती सत्ता असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार, अनोगोंदी कारभार याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो असून, बहुमतासाठी प्रयत्नशील आहोत- किशोर देशमुख, विरोधी पक्षनेते, अर्धापूरमाहुरात तिघांचे अर्जमाहूरचे नगराध्यक्षपद अनु. जातीसाठी राखीव आहे. यासाठी तीन जणांनी नामांकनपत्र दाखल केले. कॉंग्रेसकडून गौतमी कांबळे, शिवसेनेकडून बालाजी वाघमारे तर अपक्ष म्हणून शिवलिंग टाकळीकर यांनी अर्ज भरला. पालिकेत चार शिवसेना, एक अपक्ष, तीन राष्ट्रवादी, कॉंग्रेस ९ असे पक्षीय बलाबल आहे. कॉंग्रेसचे शिवलिंग टाकळीकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांचेच गणित बिघडले आहे. नगराध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.