शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

किनवट तालुक्यात ९६ गावांना गारपिटीचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:21 IST

तालुक्यात १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी वादळीवाºयासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात ९६ गावांतील रबीच्या ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, मका व रबी ज्वारीसह फळे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील सात मंडळांतील २४ तलाठी सज्जांतील ९६ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात एकूण ६ हजार २३४ हेक्टर रबीचे क्षेत्र असताना त्यातील ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी वादळीवा-यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात ९६ गावांतील रबीच्या ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, मका व रबी ज्वारीसह फळे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील सात मंडळांतील २४ तलाठी सज्जांतील ९६ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात एकूण ६ हजार २३४ हेक्टर रबीचे क्षेत्र असताना त्यातील ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका बसला. गारपीटग्रस्त गावांची नावे अशी-दहेली, धावजीनाईक तांडा, निराळा, निराळा तांडा, दुंड्रा, सारखणी, जुनोनी (बे), खंबाळा, बोथ, परसरामना तांडा, हातोळा (बे), पार्डी (सी), सक्रूनाईक तांडा, उमरी (बा), टिटवी, चिंचखेड, गौरी, धानोरा (सी), रामपूर, पाथरी, चापलाना तांडा, टेंभी तांडा, मांडवी, नागापूर, सिरपूर, कोठारी (सी), डोंगरगाव, जरुर, कनकी, मिनकी, पिंपळगा (भि), पळशी, पाटोदा (बु), भिलगाव, जवरला, रायपूर तांडा, दगडवझरा (बे), उनकदेव, पिंपळशेंडा, लिंगी, रामजीना तांडा, वझरा (बु), गोकुंदा, मारेगाव (खा), घोटी, कमठाला, खेर्डा, मलकापूर, गणेशपूर, लोणी, बोधडी (बु), कारला, बोधडी (खु), चिखली (बु), चिखली (खु), हुडी (बे), बुधवारपेठ, बेंदी, आमडी, दाभाडी, दरसांगवी (चि), प्रधानसांगवी (चि), बेंदी तांडा, आंदबोरी (चि), दहेगाव, मलकवाडी, पोतरेड्डी, पाडी (खु), पार्डी (बे), येंदा, पेंदा, कोठारी (चि), शनिवारपेठ, भुलजा, मदनापूर, सिंगारवाडी, पिंपरफोडी, सुंगागुडा, पाटोदा (खु), सिंदगी, इंजेगाव, देवला तांडा, सालाईगुडा, कोसमेट, कोल्हारी, भिसी, हुडी, मुळझरा, परोटी, वाळकी (बु), रोडानाईक तांडा, परोटी तांडा, बुरकुलवाडी, इरेगाव, पांगरी या ९६ गावांचा समावेश आहे.गहू (एकूण क्षेत्र- १६१० हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१११५ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी ६९ टक्के), रबी ज्वारी (एकूण क्षेत्र- ९६४ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-६६० हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-६८ टक्के), मका (एकूण क्षेत्र- ३३१ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-२०७ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-६२ टक्के), हरभरा (एकूण क्षेत्र-३०८६ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१६३४ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-५२ टक्के), टरबूज (एकूण क्षेत्र-२५ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-२६ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-९६ टक्के), केळी (एकूण क्षेत्र-१० हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१० हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-१०० टक्के), भाजीपाला (एकूण क्षेत्र-२०८ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१२२ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-५८ टक्के).पंचनाम्याचा अहवाल दोन दिवसांत द्याकंधार : तालुक्यात अनेक गावांत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अन् फळपिकांचे मोठे नुकसान झाले़ अशा नुकसान झालेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे ग्रामस्तरीय समितीने करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. पत्रानुसार अ,ब,क,ड अशा प्रपत्रात अहवाल द्यायचा आहे. त्यात ३३ ते ५० टक्के, ५० टक्क्यांपेक्षा जास्त अशा भागात अहवाल द्यायचा असून, तो दोन दिवसांत देण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.गारपीटग्रस्त भागाची पाहणीफुलवळ/माळाकोळी : फुलवळ, माळाकोळी परिसरातील गारपीटग्रस्त गावांना आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेटी देवून शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रबोधन मुळे, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, कृषी अधिकारी गायकवाड, विश्वांभर मंगनाळे, मंडळ अधिकारी शिवदास पटणे, कृषी पर्यवेक्षक किर्तीवाड, तलाठी कविता इंगळे, कृषी सहाय्यक कल्पना जाधव, प्रा. किशनराव डफडे, बालाजी तोटवाड, सरपंच रमेश मोरे, विश्वांभर बसवंते, ग्रामसेवक प्रकाश जाधव, गोविंद मोरे, सुधाकर मोरे उपस्थित होते. पानशेवडी येथील शेतकरी रमेश संभाजी मोरे, नामदेव माधव मोरे, कौशाबाई पांडुरंग मोरे, व्यंकट प्रभाकर मोरे, तुकाराम मोरे, पद्मिनबाई बाबाराव मोरे यांच्यासह ६५ ते ७० शेतकºयांचे नुकसान झाले.माळाकोळी परिसरातील माळेगाव, डोंगरगाव, चोंडी, मजरेसांगवी, घोटका, आष्टूर, रिसनगाव, लव्हराळ, रामतीर्थ, नगारवाडी आदी गावांना आ. चिखलीकरांनी भेटी दिल्या. यावेळी जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, पं.स.सदस्य बालाजी राठोड, पं. स.सदस्य जनार्धन तिडके, माळेगावचे सरपंच गोविंदराव राठोड, आंबादास जहागीरदार, परमेश्वर मुरकुटे, माजी सरपंच केरबा धुळगुंडे उपस्थित होते.