शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

ऑफिसमध्ये घुसून पुण्याच्या वकिलाचे अपहरण; खुनानंतर मृतदेह तेलंगणात नेऊन जाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 16:37 IST

पुण्यात ऑफिसमध्ये घुसून वकिलाचे अपहरण; तिघांना अटक

देगलूर (जि.नांदेड) : पुणे येथील वकिलाचा अनैतिक संबंधाच्या संशावरून खून केल्याची बाब तपासात समोर आली असून, या प्रकरणात पुणे पोलिसांनी देगलूर तालुक्यातील भक्तापूर येथील आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या तीन झाली आहे.

पुणे येथील शिवशंकर दत्तात्रय शिंदे (४५) या वकिलाचा खून करून त्यांचा मृतदेह तेलंगणातील कोटचिर येथे पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनी या प्रकरणात देगलूर तालुक्यातील भक्तापूर येथील राजेश्वर गणपतराव जाधव (४२, ह.मु. कोळेवाडी पुणे) या आरोपीस ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास करताना एका नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अशी घडली घटनाशिवशंकर दत्तात्रय शिंदे यांचे पुणे येथे काळेवाडीतील विजयनगरात कार्यालयात आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री आरोपींनी शिंदे यांचे कार्यालय गाठले. त्यावेळी त्यांच्यासोबत झटापट झाली. आरोपींनी शिंदे यांना मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधले. त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी बांधून एम.एच.१४/ए ८११६ या क्रमांकाच्या टेम्पोत टाकून देगलूरकडे आणले. शिवशंकर शिंदे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला आढळला.

दहा दिवसांची कोठडीया प्रकरणात पुणे पोलिसांनी देगलूर तालुक्यातील भक्तापूर येथून बालाजी मारुती आयनलवार (२४) आणि सतीश माणिकराव इंगळे (२७) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ३ झाली आहे. दरम्यान, तिन्ही आरोपींना पुणे येथील न्यायालयासमोर उभे केले असता, दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड