शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

करखेलीत चौरंगी, तर आटाळा गणात तिहेरी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:12 IST

बाजार समिती निवडणूकीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या करखेली व आटाळा गणात निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आटाळा गणात राष्ट्रवादीचे उमेदवार भावी सभापतीचे दावेदार असून करखेली गणात भाजपचे उमेदवार भावी सभापती दावेदार आहेत़ त्यामुळे या गणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करखेली व आटाळा गणात दोन माजी सभापतीची प्रतिष्ठेची बनली आहे़

ठळक मुद्देधर्माबाद बाजार समिती निवडणूकदोन माजी सभापतींची प्रतिष्ठा पणाला

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : बाजार समिती निवडणूकीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या करखेली व आटाळा गणात निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आटाळा गणात राष्ट्रवादीचे उमेदवार भावी सभापतीचे दावेदार असून करखेली गणात भाजपचे उमेदवार भावी सभापती दावेदार आहेत़ त्यामुळे या गणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करखेली व आटाळा गणात दोन माजी सभापतीची प्रतिष्ठेची बनली आहे़आटाळा गणात राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप यांच्यात तिहेरी लढत होत आहे़ तर करखेली गणात सुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व अपक्ष अशी चौरंगी लढत होत आहे. आटाळा गण हे चौथे गण असून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जागा सुटलेली आहे. या गणात आटाळा, येल्लापूर, चोळाखा, बेलगुजरी, सायखेड ही गावे समाविष्ट असून एकूण १४९७ शेतकरी मतदार आहेत. राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती दत्ताहारी पाटील चोळाखेकर यांची पत्नी गोदावरीबाई दत्तात्रय कदम या राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. काँग्रेसचे बाजार समितीचे माजी संचालक माधव पाटील शिंदे यांची पत्नी अर्चना माधव शिंदे व भाजपाचे उमेदवार अनुसयाबाई प्रकाशराव भोसले हे रिंगणात असून तिहेरी लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार गोदावरीबाई कदम या सभापतीच्या दावेदार आहेत़करखेली गण हे सातवे गण असून सर्वसाधारण पुरूषला जागा सुटली आहे. या गणात करखेली, मूतन्याळ हे दोन गावे असून एकूण १४७४ शेतकरी मतदार आहेत. भाजपाचे उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा म.वि प. ता. अध्यक्ष गणेशराव पाटील करखेलीकर, राष्ट्रवादीचे उमेदवार शंकरवार व्यंकटराव सायन्ना, काँग्रेसचे उमेदवार म.शफी रज्जाक मोहीयोद्दीन व अपक्ष उमेदवार कुलकर्णी अरूणा काशीनाथ हे एकमेकांचे विरूद्ध असून चौरंगी लढत होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडMarket Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक