शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्र घाणीच्या गराड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:43 IST

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देजलव्यवस्थापनेचा उत्तम नमुना नामशेष होण्याच्या मार्गावर, गाळाने भर घातल्याने खोली झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्राची बांधणी राजा कृष्ण (पहिला) यांनी केली़ तर पुनर्बांधणी कृष्ण (तिसरा) यांनी केली़ समुद्राचे भौगोलिक स्थान १८ बाय १० इंच अंतर अक्षांश आणि १० अंश दक्षिण रेखांश असे आहे़ बांध ९०० मीटर लांबीचा तर रुंदी ६ मीटरची आहे़ या समुद्राला कोणतीही उपनदी मिळत नाही़ तरी लहानसे नाले, माळरानावरचे पावसाळ्यातील येणारे पाणी यामुळे जलसाठा मुबलक असायचा़ यामुळे सुमारे ४० हेक्टर जमीन सिंचनाखाली यायची़ कंधार, नवरंगपुरा, मानसपुरी, बहाद्दरपुरा, कोटबाजार आदी गावांची पाणीपातळी वाढण्यास मदत होते़ गावाला पाणीपुरवठा करण्यास उपयुक्त ठरणारा हा जगतुंग समुद्र आहे़उत्तम जलव्यवस्थापनाचा हा समुद्र आजही चांगल्या स्थितीत आहे़ कुंड, घाट, जलकुंडातील मोठ्या श्रृंखला, पाणी नियंत्रण करणारे कौशल्यपूर्ण तंत्र वापरून समुद्राची उपयुक्तता सिद्ध करण्यात आली़ परंतु आजघडीला अत्यल्प पर्जन्यमानाने हा जगतुंग समुद्र भरत नाही़ शहरातील अर्ध्या भागाचे गटारांचे पाणी यात येते़ शौचालय, धुणे आदींसाठी याचा वापर केला जातो आहे़ रासायनिक व भौतिक घटकाने पाणी प्रदूषित होत आहे़ त्यात बेशरमी वनस्पती, काटेरी झुडुपे वाढली आहेत़ त्यात भर म्हणजे पाणी वाहत नाही़ त्यामुळे जगतुंग समुद्राला डबक्याचे स्वरूप आले आहे़पर्यटन विकासासाठी निधीजगतुंग समुद्रकाठावर पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला़ त्यातून अनेक कामे झाली़ अनेक कामे पूर्ण होणे शिल्लक आहे़ पर्यटनाचा उद्देश सफल होण्यासाठी अप्पर मानार प्रकल्पाचा एक कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याने जगतुंग समुद्रात पाणी सोडल्यास बारमाही समुद्र भरलेला राहील़याकडे शासनाचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे़ माजी खा़भाई डॉ़ केशवराव धोंडगे, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, माजी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरुषोत्तम धोंडगे यांनी मागणी केली़ परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला़ निवेदने, सत्याग्रह झाले, परंतु अद्याप उपकालवा जोडण्यास मुहूर्त लागला नाही़ पर्यटनाचा उद्देश मग कसा सफल होणार? हा प्रश्न आहे़ व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जगतुंग समुद्र हा पाण्याअभावी डबके, घाणीचे केंद्र बनण्याचा धोका आहे़बारमाही पाण्यासाठी उपकालव्याचे पाणी सोडाजगतुंग समुद्रकाठावर पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला़ त्यातून अनेक कामे झाली़ अजून काही होणे शिल्लक आहे़ पर्यटनाचा उद्देश सफल होण्यासाठी अप्पर मानार प्रकल्पाचा एक कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याने जगतुंग समुद्रात पाणी सोडल्यास बारमाही समुद्र भरलेला राहील, परंतु याकडे शासनाचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे़माजी खा़भाई डॉ़ केशवराव धोंडगे, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, माजी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरुषोत्तम धोंडगे यांनी मागणी केली़ परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला़ निवेदने, सत्याग्रह झाले, परंतु अद्याप उपकालवा जोडण्यास मुहूर्त लागला नाही़ पर्यटनाचा उद्देश मग कसा सफल होणाऱ हा प्रश्न आहे़ व्यापक हीत डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जगतुंग समुद्र हा पाण्याअभावी डबके, घाणीचे केंद्र बनण्याचा धोका आहे़

टॅग्स :historyइतिहासDamधरण