शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना जनजागृतीत उतरले न्यायाधीश; ऑटोतून फिरून केले घरातच राहण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:20 IST

भोकरच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांचे आॅटोत फिरून आवाहन

ठळक मुद्दे घरातच सुरक्षित राहा, मास्क वापरून कोरोनाला हरवा...पालिका कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे. 

भोकर (जि़नांदेड) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी स्वत:ला व इतरांना वाचविण्यासाठी लॉकडाऊन काळात घरात बसावे व आवश्यक कामाकरिता घराबाहेर निघाल्यास मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांनी बुधवारी आॅटोतून फिरुन ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली.

विधि सेवेसोबत विविध सामाजिक कार्यातही वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करणारे येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख हे सध्या कोरोनासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीतही स्वस्थ न बसता सामाजिक दायित्व समजून मौलिक कार्य करीत आहेत. लॉकडाऊनदरम्यान अडकून पडलेल्या अनेक मजूर कुटुंबांना दिलासा देण्यासाठी  विधि सेवा समितीच्या माध्यमातून पुढाकार घेत श्री रेणुकादेवी संस्थान माहूरमार्फत अन्नधान्य वाटप केले आहे. तसेच पालिका कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे. 

आरोग्याच्या दृष्टीने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुका विधि सेवा समिती व जिल्हा न्यायालयातर्फे जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी जनजागृती केली.  ते  स्वत: एका आॅॅटोत बसून शहरातील रस्त्यावर व चौकांमध्ये हाताात माईक घेऊन शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा,  मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, साबणाने हात स्वच्छ धुवा असे आवाहन केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश एम. पी. पांडे व  पोलीस निरीक्षक विकास पाटील, न्यायालयीन कर्मचारी व्ही.व्ही. कृष्णावाड, पालिका कर्मचारी दिलीप वाघमारे उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून असाधारण पदावरील न्यायाधीश महोदय रस्त्यावर उतरून अशाप्रकारे जनजागृती केल्याचा अनुभव शहरवासियांनी प्रथमच घेतला . 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस