शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

अखेर नांदेडकरांसाठी नाथसागरच आला धावून; विष्णूपुरीत दिग्रस बंधाऱ्यातून पाणी पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 18:44 IST

नांदेडात जायकवाडीचे पाणी आले

ठळक मुद्दे‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’

नांदेड : अभूतपूर्व पाणीटंचाईने मागील ४ महिन्यांपासून तहानलेल्या नांदेडकरांना जायकवाडीतून आलेल्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे़ पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी सकाळी ६ वाजता सोडलेले पाणी १२ तासांत विष्णूपुरीत  पोहोचले आहे़ या पाण्यामुळे नांदेडकरांची तहान भागली जाणार आहे़

जायकवाडी धरण पहिल्यांदाच ९५ टक्के भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे़ संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी गोदावरी नदीत असलेले १२ बंधारे जवळपास २५ टक्के भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ याच निर्णयामुळे जायकवाडीचे पाणी २६ आॅगस्ट रोजी विष्णूपुरीत पोहोचले आहे़

सोमवारी सकाळी पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून ३ हजार ५०० क्युसेक्स वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले़ हे पाणी सायंकाळी ६ वाजता विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचले आहे़ हे पाणी सुरूच ठेवले जाणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला १७़६६ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ जवळपास २१़८६ टक्के पाणी होते़ दिग्रस बंधाऱ्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे विष्णूपुरीचा जलसाठा ५० टक्के होणार आहे़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्यातून नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे हे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे़ यामध्ये इतर विभागांची साथही महत्त्वाची ठरणार आहे़ त्यात महावितरणची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे़ महावितरणला २०१८ मध्ये आॅक्टोबरमध्ये अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते़ मात्र त्याकडे महावितरणने कानाडोळाच केलाच़ याचा फटका शहरवासियांना बसला़ प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध पाणीउपशामुळे मेअखेर तर विष्णूपुरी मृतसाठ्यात पोहोचला़ सिद्धेश्वर धरणातील पाणी आणून नांदेडकरांची तहान कशीबशी भागविण्यात आली़ आजही शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे.

‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’नांदेड शहराला मागील सहा महिन्यांपासून टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ पावसाळ्याचेही जवळपास ३ महिने उलटले आहेत़ जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे आगामी काळातील नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता जायकवाडीतून जास्तीत पाणी घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सांगितले़ जायकवाडीतील पाणी आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडJayakwadi Damजायकवाडी धरणvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी