शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत सासूला वाचवणे पडले महागात; सासऱ्याकडून सुनेची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 15:24 IST

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील देगाव येथील घटना

ठळक मुद्देया घटनेनंतर आरोपी सासरा घटनास्थळावरुन पसार झाला आहे. शेजारच्यांनी उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना सुनेचा मृत्यू

नायगाव (जि. नांदेड) : शुल्लक कारणावरुन सासूला बेदम मारहाण करीत असताना तिला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या सुनेचा सासऱ्याकडून काठीने वार करुन खून झाला. ही घटना बुधवारी नायगाव तालुक्यातील देगाव येथे घडली आहे. या घटनेनंतर आरोपी सासरा किसन मोरे घटनास्थळावरुन पसार झाला आहे. 

किसन मोरे हा सासरा पत्नी आणि दोन विधवा सुनांसोबत तालुक्यातील देगाव येथे राहत होते. नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरुन नेहमीच खटके उडायचे. बुधवारी सकाळीही किशन मोरे यांचे त्यांच्या बायकोमध्ये भांडण सुरू झाले. यावेळी किशन मोरे हे पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत काठीने अमानुषपणे मारहाण करीत होते. हा प्रकार पाहून घाबरलेली मोठी सून मिराबाई (३२) ही भांडण सोडविण्यासाठी गेली असता रागाच्या भरात सासरा किसन मोरे याने सुनेलाही काठीने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत मीराबाई रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्या व खाली कोसळल्या. मात्र, त्यानंतरही सासऱ्याकडून पत्नीस मारहाण सुरूच होती. हा आरडाओरडा ऐकूण शेजारच्या नागरिकांनी  मोरे यांच्या घराकडे धाव घेतली असता सून रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे आढळून आले. शेजारच्यांनी तात्काळ सुनेला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी  मयत मीराबाई हिचा भाऊ सोमठाणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुंटूर पोलीस ठाण्यात आरोपी किशन मोरे (वय ६५ वर्षे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर किशन मोरे हा पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनNandedनांदेडPoliceपोलिस