शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरचे पाणी आसनात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:18 IST

शहरवासियांची तहान भागविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून अडीच दलघमी पाणी घेण्यात आले असून प्रत्यक्षात १ दलघमी पाणी आसनेच्या पात्रात उपलब्ध होणार आहे. यातून शहरवासियांची जवळपास २५ ते ३० दिवसांची तहान भागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.

ठळक मुद्देमहापालिका : पर्यायी पाणीपुरवठा योजनाही सुरू होणार, २५ दिवस नांदेडची तहान भागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरवासियांची तहान भागविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून अडीच दलघमी पाणी घेण्यात आले असून प्रत्यक्षात १ दलघमी पाणी आसनेच्या पात्रात उपलब्ध होणार आहे. यातून शहरवासियांची जवळपास २५ ते ३० दिवसांची तहान भागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.विष्णूपुरीतील उपलब्ध पाण्यातून शहरवासियांची तहान भागवणे अवघड होत असल्याने नांदेड महानगरपालिकेने आसना नदीवर पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू केली. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेड महापालिकेने इसापूर प्रकल्पात १० दलघमी पाणी राखीव ठेवले होते. यावर्षी इसापूर प्रकल्पाने तळ गाठल्याने इसापूरमधून नांदेडसाठी पाणी मिळेल की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र इसापूर प्रकल्पातून नांदेडसाठीही अडीच दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शनिवारी सायंकाळी ६ वाजता पोहोचले. रात्री उशिरापर्यंत जवळपास १ दलघमी पाणी आसनेमध्ये उपलब्ध होईल. दरम्यान, विष्णूपुरी प्रकल्पातही १० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणातून घेतले जाणार आहे. १२ एप्रिलपासून हे पाणी सिद्धेश्वरमधून सोडले जाईल. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात १२.२८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. १२ मार्च रोजी दिग्रस बंधाऱ्यातून २५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात घेण्यात आले होते. प्रकल्पातून सिंचनासाठी नियोजित पाणीपाळ्यामुळे प्रकल्पातील जलसाठा आजघडीला १५ टक्क्यांवर आला आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई लक्षात घेता सिद्धेश्वरमधून १० दलघमी पाणी घेण्यात येत आहे. शहरवासियांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख, कार्यकारी अभियंता अंधारे यांनी केले आहे.मे महिन्यात दुसरे रोटेशन मिळणारहे पाणी सांगवी पंपावरुन काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचेल. तेथून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. इसापूरमधून उपलब्ध झालेल्या जवळपास १ दलघमी पाण्यातून शहरवासियांची २५ ते ३० दिवसांची तहान भागणार आहे. इसापूर प्रकल्पातून दुसरे रोटेशन हे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात घेतले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :water transportजलवाहतूकriverनदी