शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धान्य घोटाळ्याचा तपास थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:59 IST

कृष्णूर येथील इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील धान्य घोटाळ्याचा तपास गुप्तचर विभागाकडे गेल्यापासून हे प्रकरण जणू थंडबस्त्यातच जमा झाले आहे़

ठळक मुद्देगुप्तचर विभागाकडे तपाससंशयित आरोपी झाले बिनधास्तप्रकरणात एकालाही अटक नाही

नांदेड : कृष्णूर येथील इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील धान्य घोटाळ्याचा तपास गुप्तचर विभागाकडे गेल्यापासून हे प्रकरण जणू थंडबस्त्यातच जमा झाले आहे़ या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला? आरोपींच्या अटकेसाठी काही प्रयत्न करण्यात येत आहेत काय? याबाबत कुठलाही मागमूस लागत नसून या प्रकरणातील आरोपी मात्र खुलेआम नांदेडात फिरत आहेत़ त्यामुळे आरोपींना वाचविण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही़१८ जुलै रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीवर छापा मारला होता़ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचे दहा ट्रक या ठिकाणी पकडण्यात आले होते़ धान्याच्या या काळा बाजार प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता़ प्रारंभी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता़ परंतु, प्रकरणाची वाढणारी व्याप्ती लक्षात घेता मीना यांनी सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे तपास दिला होता़सहाय्यक पोलीस अधीक्षक हसन यांनी या प्रकरणाचा सूक्ष्म तपास केला़ प्रत्येकाची झाडाझडती घेतली़ त्यातून हा कोट्यवधींचा घोटाळा असल्याचे समोर आले़ वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार, मेगा कंपनीचे संचालक जयप्रकाश तापडीया यांचा दोनवेळेस बिलोली न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळला होता़त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचे धाबे दणाणले होते़ काहीही करुन नुुरुल हसन यांच्याकडून तपास काढून घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन हालचाली करण्यात आल्या़ या प्रकरणात जीपीएस प्रणाली, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ चित्रीकरण, आरोपींचे कॉल रेकॉर्ड यासह अनेक भक्कम पुरावे हसन यांनी गोळा केले होते़ तसेच न्यायालयातही त्यांनी आपली बाजू जोरकसपणे मांडली होती़ असे असताना हा तपास गुप्तचर विभागाकडे सोपविण्याचा अनपेक्षित निर्णय घेण्यात आला़ हा तपास हसन यांच्याकडून काढला जावू नये यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत काहींनी धाव घेतली होती़ परंतु, त्यानंतरही गुप्तचर विभागाकडे हे प्रकरण देण्यात आले़त्यात आता गुप्तचर विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे़ परंतु, तपास कुठपर्यंत आला याबाबत अनभिज्ञता आहे़ त्यामुळे या प्रकरणातील आरोपीही बिनधास्त आहेत़ त्यामुळे पोलीस अधीक्षक मीना, सहाय्यक पोलीस अधीक्षक हसन यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरते की काय, अशी शंका सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केली जात आहे़आरोपींचा सार्वजनिक ठिकाणी वावरया प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे करीत असताना एकही आरोपी शहरात येऊ शकत नव्हता़ आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची भीती होती़ त्यात न्यायालयातूनही त्यांना जामीन मिळत नव्हता़ त्यामुळे या प्रकरणातील मातब्बरांनी हा तपास हसन यांच्याकडून काढून घेण्याचीच इच्छा होती़ त्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचालीही करण्यात आल्या होत्या़ परंतु, आता गुप्तचर विभाग हा तपास करीत असून आरोपीही बिनधास्त झाले आहेत़ शहरात सार्वजनिक ठिकाणी खुलेआम आरोपींचा वावर सुरु आहे़ त्यामुळे तपास नेमका कशाचा सुरु आहे, याबाबत चर्चा सुरु आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेडCrime Newsगुन्हेगारी