शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणात फरार पोलीस निरीक्षक दिलीप तिडकेची शरणागती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 15:56 IST

१९ दिवसांनंतर एसीबीपुढे शरणागती पत्करली़

किनवट (जि़ नांदेड) : पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी सहमती दर्शविणारे किनवट पोलीस ठाण्यातील फरार पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांनी १९ दिवसांनंतर एसीबीपुढे शरणागती पत्करली़ त्यांच्या अटकेने त्या दोन बॅगेत किती रोकड होती? सील लावलेल्या निवासस्थानी काय आहे? याचा उलगडा होणार आहे़

चुलत्याने पुतण्याच्या विरोधात मालमत्ता हडप केल्याची तक्रार किनवट पोलीस ठाण्यात दिली होती़ त्यानंतर पुतण्याच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी पोनि़ दिलीप तिडके यांनी पोलीस नायक मधुकर पांचाळ यांच्या माध्यमातून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ ती स्वीकारताना  १४ जून रोजी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नांदेडच्या ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले होते़ मात्र ती रक्कम स्वीकारण्यासाठी सहमती देणारे पोनि़ तिडके हे पसार झाले होते़ 

‘एसीबी’ने पोलीस नायक मधुकर पांचाळ व पोलीस कर्मचारी पांडुरंग बोईनवाड यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याचवेळी पोनि़ तिडके यांच्या निवासस्थानी पैशाने भरलेली एक बॅग होमगार्डच्या मदतीने पळविली जात असताना जागरुक नागरिकांनी पकडली़ त्या बॅगेतून ४ लाख ७२ हजार रुपये जप्त करण्यात आले़ मात्र उर्वरित दोन बॅगा पळविण्यात तिडकेचे हितचिंतक यशस्वी झाले होते़ तिडके यांच्या मागावर एसीबीने दोन पथके नियुक्त केली होती़ याचदरम्यान अटकपूर्व जामीन मिळावा म्हणूनही तिडकेने प्रयत्न केला. मात्र, अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता़ त्यानंतर बुधवारी तिडके हे एसीबीला शरण आले़  तिडके यांना आज किनवट येथे आणण्यात आले होते़ सील लावलेले निवासस्थान एसीबीच्या पथकाने उघडले असून, त्याची झाडाझडती घेण्यात आली़  

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग