शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

विभागीय पथकाकडून वाळूघाटांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:30 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या अमाप वाळू उपशाची विभागीय कार्यालयाने दखल घेत गुरुवारी थेट दोन पथके जिल्ह्यात पाठवत नायगाव आणि उमरी तालुक्यातील वाळू घाटांची पाहणी केली.

ठळक मुद्देवाळू माफियांना चाप परभणी, हिंगोलीच्या पथकांनी केली मेळगाव, महाटी, येंडाळा, कौडगाव घाटांची पाहणी

नांदेड/नरसीफाटा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अमाप वाळू उपशाची विभागीय कार्यालयाने दखल घेत गुरुवारी थेट दोन पथके जिल्ह्यात पाठवत नायगाव आणि उमरी तालुक्यातील वाळू घाटांची पाहणी केली. अचानकपणे करण्यात आलेल्या या तपासणीमुळे वाळू माफियांसह जिल्हा महसूल विभागही हादरला आहे. विशेष म्हणजे या पथकाने गोदावरी परिसराची ड्रोन कॅमेराने छायाचित्रण केले आहे.जिल्ह्यात जवळपास १० ते १२ वाळूघाटावर उपसा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. या ठिकाणी नियमांना डावलून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता. विशेषत: नायगाव, बिलोली आणि उमरी तालुक्यातील तक्रारी मोठ्या प्रमाणात विभागीय आयुक्तांपर्यंत पोहचल्या होत्या. या अमाप वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी सुरू होती. स्थानिक अधिकारी वाळू उपशाच्या तक्रारीकडे दूर्लक्ष करीत असल्याने अनेक तक्रारकर्त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर विभागीय आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेत गुरुवारी दोन पथके नांदेड जिल्ह्यात पाठवली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने परभणी व कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी व परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील गौणखनिज विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान थेट मेळगावच्या रेती घाटावर पोहचले. एम एच २२ डी ७२११ या क्रमांकाच्या बोलेरो गाडीतून सहा ते सात जनांचे पथक गोदावरी नदीत मेळगावच्या गोदावरी नदीत परभणीचे अधिकारी पोहचल्यानंतर त्यांनी ड्रोन कँमेºयाच्या सहाय्याने नदीतील मोठमोठ्या खड्याचे छायाचित्र व मोजमाप काढले. त्यानंतर दुपारी या रेतीघाटापासून काही अंतरावर असलेल्या त्याचबरोबर मेळगाव व सांगवी शिवारात साठवलेल्या अवैध रेतीसाठ्याचेही मोजमाप घेवून कोणाकोणाच्या गट नंबरमध्ये रेती साठवण्यात आली आहे याची माहीती घेण्याचे आदेश तलाठी व मंडळ निरीक्षकांना दिले आहेत. या पथकाने रेती घाटाची व परिसराचे अतिशय बारकाईने मोजमाप काढण्याच्या कामात दिवसभर व्यस्त होते.या पथकाने उमरी तालुक्यातील महाटी, कौडगाव आणि येंडाळा येथील वाळूघाटांचीही पाहणी केली. येथे झालेले उत्खनन किती झाले याची मोजणी करण्यात आली आहे. या पथकाकडून मोजणीचे काम दिवसभर सुरू होते. मेळगावच्या रेती घाटातील मोजमाप काढण्यासाठी पथक गोदावरी नदीत पोहचल्यानंतर लिलाव धारक अक्षरश: हादरुन गेले असून सदर प्रकरणी काय कारवाई होते याची धास्ती घेतली आहे तर दुसरीकडे दोन दिवसापूर्वी नायगाव तहसील कार्यालयातील तिघांना मेळगाव प्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नायगाव तहसील कार्यालयही संशयाच्या भोवºयात अडकले आहे.नायगाव तालुक्यात नियम डावलून होत असलेल्या वाळू उपशा संदर्भात तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याकडे तक्रारीचा पाऊस पडला असतांना या सर्व तक्रारींकडे त्यांनी कानाडोळा केला. तहसीलदार काहीच कारवाई करत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. तिथेही त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रेती माफियांचेच नायगाव तालुक्यात साम्राज्य अशीच परिस्थिती आहे.प्रभारी जिल्हाधिकारी पोहोचले रेती घाटावरपरभणी जिल्ह्यातील पथकाकडून मेळगावच्या रेती घाटाची मोजमाप व तपासणी होत असल्याची माहिती जिल्हा महसूल विभागाला मिळताच प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी यांनीही थेट मेळगावला गाठले. त्यांनी गोदावरी नदी पात्राची पाहणी केली. विभागीय आयुक्ताचे पथक आल्याची नायगाव तहसीलला माहीती मिळताच नायगाव तहसील कार्यालय हादरुन गेले. त्यानंतर तातडीने उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रभारी तहसीलदार नंदकुमार भोसीकर, नायब तहसीलदार वगवाड आदी अधिकारी मेळगावला हजर झाले. याचबरोबर धमार्बाद व बिलोलीचे उपविभागीय अधिकारी मेळगावला पोहचले होते.एकूणच या तपासणीमुळे नायगाव, उमरी, बिलोली तालुक्यातील वाळू माफिया हादरले आहेत.

विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या पथकाकडून मेळगाव, कौडगाव, येंडाळा व बिजेगाव येथे पाहणी करण्यात आली. मेळगाव येथे वाहने नव्हती. येंडाळा येथील वाहने पळून गेली तर बिजेगाव येथे काही वाहने सापडली आहेत. हे पथक नायगाव आणि उमरी तालुक्यात झालेल्या वाळू उपसा व साठ्यांचे मोजमाप काढणार आहेत.-श्रीकांत गायकवाड, उपविभागीय अधिकारी

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूHingoliहिंगोलीparabhaniपरभणी