मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ११ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या ११ केंद्रांवर कोविशिल्डचे याठिकाणी ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी १०० डोस उपलब्ध केले आहेत.
याव्यतिरिक्त कोव्हॅक्सिन ही लस दोन्ही गटांसाठी श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको अशा एकूण ११ केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस याप्रमाणे उपलब्ध करून दिली आहेत. या ठिकाणी १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १६ केंद्रांवर कोविशिल्डची ही लस प्राधान्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकूण १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले असून हे डोस १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील. जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशिल्ड ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून याठिकाणी ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व ६७ केंद्रांवर प्रत्येकी १०० याप्रमाणे डोस उपलब्ध करून दिले आहे.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. ७ जूनपर्यंत कोविशिल्डचे ४ लाख २७ हजार ३३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख २५ हजार ७०० डोस याप्रमाणे एकूण ५ लाख ५३ हजार ३० डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डचे डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सिनचे डोस हे १८ ते ४४ वयोगट व ४५ वर्षांवरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या १२ ते १६ आठवडे म्हणजेच सुमारे ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरिता ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.