शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बाबा जोरावर सिंग अन् फतेह सिंग यांच्या शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल; गिरीश महाजन यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2023 20:14 IST

आजपासूनच अधिक सुसंस्कृत, जबाबदार, कर्तव्य तत्पर आणि निरव्यसनी व्हा, असे भावनिक आवाहन गिरीश महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. 

नांदेड: संपुर्ण भारताला शौर्याचा समृद्ध वारसा देणाऱ्या साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या स्मृतीचा आजचा दिवस आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णय या कोवळ्या बालकांवर मुघल शासक वजीर खान याने लादला होता. या बालकांनी मरण यातना सहन केल्या. परंतु धर्म बदलणार नसल्याचे सांगितले. आपल्या शीख धर्माला त्यांनी प्राधान्य दिले. भारतातील सर्वांसाठी ही घटना एक मिसाल बनली आहे. सर्वांसाठी ही प्रेरणा असून हा शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी केले. 

गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्यावतीने येथील गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे अयोजित करण्यात आलेल्या वीर बाल दिवस व सर्व धर्म संमेलनात ते बोलत होते. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सर्व धर्माप्रती आदर व श्रद्धा असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. परस्पर धर्मा विषयी संहिष्णुता गरजेची आहे. परस्पर आदराच्या शिकवणुकीला आपल्या संस्कृतीने प्राधान्य दिले आहे. भारताला जी त्यागाची परंपरा लाभलेली आहे त्यातील शौर्य व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्याप्रती कायम कृतज्ञता युवकांनी बाळगली पाहिजे. एका समृद्ध पायावर उभा असलेला देश भविष्यात तुम्हा युवकांच्या हाती येणार असून त्यासाठी आजपासूनच अधिक सुसंस्कृत, जबाबदार, कर्तव्य तत्पर आणि निरव्यसनी व्हा, असे भावनिक आवाहन गिरीश महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहिबजादे, बाबा जोरावर सिंग, बाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाला अधोरेखीत करून 9 जानेवारी 2022 रोजी आजचा दिवस वीर बाल दिवस दिन म्हणून भारतभर साजरा होईल असे सर्व प्रथम जाहीर केले. या पाठिमागे सर्व मुलांना त्यागाची प्रेरणा मिळावी या उद्देश त्या पाठिमागे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उद्याच्या सशक्त भारतासाठी आयुष्यभर आपण कोणतेही व्यवसने करणार नाही व करून देणार नाही अशी शपथ घेण्याचे भावनिक आवाहनही गिरीश महाजन यांनी मुलांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा वीर बाल दिवस साजरा करतांना संपूर्ण देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा संपूर्ण देशाचा सन्मान आहे, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगून वीर बालकांना नमन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघजी यांनी केले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनNandedनांदेड