शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

नांदेड जिल्हा परिषदेत उत्पन्न वाढ,मालमत्तेचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:21 IST

या सभेत जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीबरोबरच मालमत्तांचा मुद्दा ऐरणीवर असून याबाबत या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देउत्पन्न वाढविण्यासंदर्भात कसलाही ठोस निर्णय नाहीमोक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेची मालमत्ता विकास कामांनाही गती मिळू शकते

नांदेड :जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीबरोबरच मालमत्तांचा मुद्दा ऐरणीवर असून याबाबत या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.जिल्हा परिषदेच्या कारभाराला २ वर्षे होत आहेत. मात्र जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासंदर्भात कसलाही ठोस निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे शहरातील विविध भागासह जिल्ह्यातही मोक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेची मालमत्ता असतानाही या जागांचा विकास करण्याकडेही प्रशासनांनी कानाडोळा केलेला आहे. अत्यल्प उत्पन्नामुळेच सेस फंडातून जिल्हा परिषद सदस्यांना अवघा २ कोटी विकास निधी मिळतो. यातून प्रत्येक सदस्याला अवघे ४ ते ५ लाख विकास कामांसाठी उपलब्ध होतात. जिल्हा परिषदेने स्वत:चे उत्पन्न वाढविल्यास विकास कामांनाही गती मिळू शकते. नांदेड उत्तरमधील तरोडा नाका येथील ३ एकर २० गुंठे भूखंडाचा प्रश्नही वादात आहे. या जागेसह मल्टीपर्पज येथील जागेच्या विकासाचा पर्यायही उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेसमोर आहे. दरम्यान, हा विषय ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला. गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये या अनुषंगाने चर्चाही करण्यात आली असून शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या संबंधी चर्चा होऊन ठोस निर्णय होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदIncome Taxइन्कम टॅक्सTaxकर