महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही काही कथा, कांदबऱ्या तसेच पुस्तकातून केले जात आहे. कुबेरांच्या ‘रेनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी, कुबेर यांनी याच पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीराव पेशव्यांसोबत केली आहे. अशा लिखाणातून दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची दखल घेऊन सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालून कारवाई करावी.
‘यास’ चक्रीवादळामुळे संत्रागच्ची - नांदेड एक्स्प्रेस रद्द
नांदेड : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यात येणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळामुळे नांदेड- संत्रागच्ची नांदेड एक्स्प्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २६ मे रोजी धावणारी गाडी क्रमांक ०२७६८ संत्रागच्ची ते श्री हुजूर साहिब नांदेड ही गाडी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजूपत समाजाचे राजेंना निवेदन
नांदेड : अखिल भारतीय क्षत्रिय महासभा (राजपूत) नांदेड जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भात पाठिंबा देण्याचे पत्र छत्रपती खासदार संभाजीराजे यांना देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा राजपूत नांदेड जिल्हा कार्यकारिणी मराठवाडा अध्यक्ष शरदसिंह चौधरी, जिल्हा अध्यक्ष अर्जुनसिंह ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राम चव्हाण उपस्थित होते.