शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ग्रामीण भागात अवैध दारु विक्री जोरात; ३२ जण अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:46 IST

लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी मद्यविक्री बंद आहे़ अशा काळात अवैध गावठी दारु विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे़

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाला आली जागबनावट दारुचेही पीक फोफावले

नांदेड : लॉकडाऊन काळात नांदेड शहरासह ग्रामीण भागात अवैध दारु विक्रीचे पेव फुटले आहे़ अनेक वाड्या-तांड्यावर बिनबोभाट अवैध दारु विक्री केली जात असून, यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे़  या विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकून ३२ जणांना अटक केली आहे़

लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी मद्यविक्री बंद आहे़ अशा काळात अवैध गावठी दारु विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे़ शहरातील अनेक भागांसह ग्रामीण भागातही त्यामुळेच हातभट्टी दारुची मोठ्याप्रमाणात विक्री सुरु असल्याचे चित्र आहे़ नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे़ सोमवारी मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा, उमाटवाडी तसेच नांदेड तालुक्यातील वाजेगाव व पुणेगाव येथे अवैध हातभट्टी दारु अड्यावर धाडी टाकून पथकाने ३२ आरोपींना अटक केली़ या आरोपींकडून २० दुचाकी वाहने व एका चारचाकी वाहनासह हातभट्टीची ५९० लिटर दारु जप्त करण्यात आली आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस़एसख़ंडेराय, एस़एम़बोधमवाड, पी़ए़मुळे, पी़टी़शेख, मोहम्मद रफी, अमोल शिंदे आदींनी ही कारवाई केली़

एकीकडे कारवाई दुसरीकडे विक्री सुरुचलॉकडाऊनच्या काळात हातभट्टी दारु अड्डे मात्र जोमात असल्याचे चित्र आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातही ही दारु सर्रासपणे उपलब्ध होत आहे़ या विरोधात नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाईचा बडगा उगारते़ मात्र एकीकडे कारवाई सुरु असताना जिल्ह्याच्या अनेक भागात हातभट्टी दारु सर्रासपणे विकली जात असल्याचे चित्र असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही अवैध विक्री रोखण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे़

बनावट दारुचेही पीक फोफावलेलॉकडाऊनमुळे १४ मार्चपासून जिल्ह्यातील वाईन शॉप, परमीट रुमसह देशी दारुची दुकान बंद आहेत़ मात्र त्यानंतरही चोरट्या मार्गाने दारु विक्री शहर आणि जिल्ह्यात येत असून, चढ्या भावाने ती घरपोच पोहोचविली जात असल्याच्या तक्रारी आहेत़ विशेष म्हणजे हीच संधी साधत बनावट दारुचेही पेव फुटले आहे़ ही बनावट दारु जास्त प्रमाणात सेवन केल्यास जीवाला धोका निर्माण होवू शकतो़ त्यामुळे प्रशासनाने या विरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी होत आहे़ सद्य:स्थितीत छुप्या मार्गाने चौपट किमतीत देशी-विदेशी मद्याची विक्री होत असल्याची चर्चा आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडalcohol prohibition actदारुबंदी कायदा