शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'वंचित बहुजन आघाडी'कडून प्रस्ताव आल्यास विचार करू : जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:38 IST

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडीची बोलणी सुरू असून दोन जागांची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले़

 नांदेड : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीला सीपीआय, सीपीएमसारखे डावे पक्ष चालतात़ परंतु रिपब्लिकन चालत नसल्याचे दिसत आहे़ अद्यापपर्यंत तरी वंचित आघाडीसाठी आमच्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही़ अ‍ॅड़ आंबेडकरांनी तसा प्रस्ताव दिल्यास आघाडीसाठी विचार करू, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा़जोगेंद्र कवाडे यांनी केले़ आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडीची बोलणी सुरू असून दोन जागांची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले़

नांदेड येथे मंगळवारी कवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली़ यावेळी ते बोलत होते़ राज्यात पडत्या काळात आम्ही काँग्रेसची साथ दिली़ आमच्या सोबतीमुळेच नांदेड महानगरपालिकेतही काँग्रेसला बहुमत मिळाले़ त्यामुळे काँग्रेसने स्वीकृत सदस्यांच्या पाच जागेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीला एक जागा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली़ दरम्यान, केंद्रातील भाजपा सरकारवर प्रा.क़वाडे यांनी यावेळी जोरदार टीका केली़ देशात संविधानिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे़ आमच्या कलेनेच वागले पाहिजे असा दबाव निर्माण केला जात आहे़ त्यामुळे देशातील एकसंघतेला धोका निर्माण झाला आहे़ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशात महाआघाडी केली जात आहे़ असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बापुराव गजभारे, गणेश उनवणे, शशीभाई उनवणे, विनोद भरणे, कुलदीप चिकाटे आदींची उपस्थिती होती़ 

ईव्हीएम मशीनवर शंका कायम ईव्हीएमद्वारे मतदान ही प्रणाली अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने बंद केली आहे़ ईव्हीएमवर नागरिक शंका घेत असतील तर ती निवडणूक आयोगाने बंद करावी व पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणीही यावेळी कवाडे यांनी केली़ ईव्हीएम हॅक करता येते की नाही हा प्रश्न संशोधनाचा असला तरी या मशीनवरील शंका मात्र कायम आहे़ ईव्हीएम बंद करण्याच्या मागणीसाठी आम्हीही मोर्चे काढले आहेत़ गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत करावी असेही ते म्हणाले़ 

पहा व्हिडिओ : 

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूक