शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांनी पाडलेले खड्डे मी बुजवतोय - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 15:30 IST

'त्या' महापालिकांनाही निधी मिळायला हवा अशी भूमिका

ठळक मुद्देसरकार ५ वर्ष पूर्ण करेलमहाविकास आघाडी भक्कम

नांदेड : मागच्या सरकारने दिशाहीन काम केले. मराठवाड्यावर अन्याय केला. हे सगळे मागचे खड्डे आहेत. त्या सरकारमधील चंद्रकांत पाटील यांनी पाडलेले हे खडडे मी आता बुजवत आहे असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला.  ते नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. 

काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी परभणी येथे केले होते. या वक्तव्याबाबत मंत्री चव्हाण यांनी आपण तसे म्हणालो नसून त्या महापालिकेलाही निधी मिळायला पाहिजे अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. तसेच काँग्रेस पक्ष भक्कम आहे. महाविकास आघाडी ५ वर्ष पूर्ण करेल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

काय म्हणाले होते अशोक चव्हाण काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत, आम्ही मुख्यमंत्र्यांना २-३ वेळा सांगितले, तीन पक्षांचे सरकार आहे, असं असताना आमच्याही महापालिकेला निधी मिळाला पाहिजे. आम्हालाही ताकद मिळाली पाहिजे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली तसेच निवडणुकीनंतर भाजपाचं सरकार येऊ नये यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, शिवसेनेची आघाडी करायची की नाही? याबाबत भरपूर चर्चा झाली, सोनिया गांधी आमच्यावर नाराज होत्या. परंतु आमची मते आम्ही पक्षनेतृत्वाकडे मांडली, भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेला पाठिंबा दिला, भाजपाचं सरकार नको, त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी भूमिका पटवून सांगितले, त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये आली असंही अशोक चव्हाणांनी सांगितले.  

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणchandrakant patilचंद्रकांत पाटीलState Governmentराज्य सरकार