शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून पती, पत्नीस विष पाजून जिवे मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:59 IST

तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी समाजातील पंचांसमक्ष बैठकही झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही.

ठळक मुद्दे ९ जणांविरुद्ध गुन्हा, दोघे अटकेत नांदेड जिल्ह्यातील जुनापाणीची घटना

माहूर/वाईबाजार (जि. नांदेड) : माहूर तालुक्यातील जुनापाणी येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीस भावकीतील लोकांनी बळजबरीने विष पाजून ठार मारले. बंडू राठोड (५२) आणि यशोदाबाई राठोड (४५), अशी मृतांची नावे आहेत. सिंदखेड पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी मध्यरात्री ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून गुरुवारी दोघांना अटक केली आहे. 

हुमाणी बंडू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जून रोजी सकाळी सातच्या सुमारास खंडू मिसू राठोड, राजेश मिसू राठोड, बेबीबाई खंडू राठोड, प्रियंका राजेश राठोड, कांताबाई मिसू राठोड, संजय मिसू राठोड, निखिल खंडू राठोड, निकिता खंडू राठोड व पांडू मिसू राठोड यांनी बंडू राठोड, यशोदाबाई राठोड यांना मारहाण करुन जबरदस्तीने विष पाजले व त्यांच्या अंगावर विष ओतले. दोघांनाही तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.  नंतर त्यांना यवतमाळ येथील स्व.वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ८़३० च्या सुमारास बंडू राठोड यांचा मृत्यू झाला तर  बुधवारी यशोदाबाई यांचा मृत्यू झाला. सिंदखेड पोलिसांत याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध बुधवारी मध्यरात्री खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुरुवारी खंडू राठोड, राजेश राठोड  या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी दिली.

भावकीत नेहमीच उडायचे खटकेमाहूर तालुक्यातील जुनापाणी येथील बंडू मिसू राठोड यांना जुनापाणी येथे वडिलोपार्जित ५ एकर व वाई बाजार येथे मेहनतीच्या जोरावर घेतलेली ४ एकर, अशी एकूण ९ एकर जमीन आहे. त्या जमिनीवर खंडू मिसू राठोड यांचा डोळा होता. समसमान हिस्सा वाटून देण्याचे कारण पुढे करून भावकीत नेहमीच खटके उडत असत. त्यावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी समाजातील पंचांसमक्ष बैठकही झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस