शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'आई, माझे कसे होणार'; हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच सोडले मुलीने प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:42 IST

आठ महिन्यांपूर्वी मुलीच्या पतीचा झाला होता मृत्यू 

- संदीप तुपकरीहदगाव: तामसा येथील गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा वृद्धापकाळाने मृत्यू शुक्रवारी मृत्यू झाला. वार्ता समजताच घरी आलेल्या मुलीने ' आई माझे कसे होणार' असा हंबरडा फोड आईच्या मृतदेहावरच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना ३१ मार्च रोजी घडली. जयमाला दिलीपराव जाधव (५६ ) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. एकाच दिवशी घरात दोन मृत्यू झाल्याने शेवाळकर आणि जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तालुक्यातील तामसा येथील गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा शुक्रवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. गयाबाई यांची एक मुलगी जयमाला जाधव काही अंतरावरील येवली गावात राहते. वार्ता समजताच जयमाला यांनी अंत्यदर्शनासाठी माहेर गाठले. मृतदेह पाहत जयमाला यांनी हंबरडा फोडला. 'आई तुझ्याशिवाय माझे कसे होणार', असे म्हणत जयमाला आईच्या मृतदेहावर कोसळल्या. त्यांना लागलीच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

आठ महिन्यांपूर्वी पतीचा झाला होता मृत्यू जयमाला यांचे सेवानिवृत्त पती दिलीप जाधव यांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तसेच एक वर्षांपूर्वी जयमाला यांचे सासू-सासरे यांचा देखील मृत्यू झाला होता. सासू-सासऱ्यांच्या पाठोपाठ पतीच्या निधानातून सावरत नाहीत तोवर आईच्या निधनाची वार्ता समजल्याने धक्काबसून जयमाला यांचा देखील मृत्यू झाला.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यू