शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहूंचे हात कोरडेच कसे ओ? बागायतीसाठी १७००० रुपये 

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: November 11, 2023 06:02 IST

पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग मराठवाड्यातील बागायतदारांसोबतच दुजाभाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.   

- रामेश्वर काकडे

नांदेड : राज्य शासनाने बागायत क्षेत्रासाठी १७ हजार तर कोरडवाहू क्षेत्रासाठी ८,५०० रुपयांची नैसर्गिक आपत्ती मदत जाहीर केली आहे. परंतु, मराठवाड्यातील बागायतदारांना कोरडवाहू क्षेत्राचीच आजपर्यंत आपत्ती मदत मिळालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग मराठवाड्यातील बागायतदारांसोबतच दुजाभाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.   राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आलेली आहे. या निधीमध्ये केंद्राकडून ७५ टक्के तर राज्य सरकारकडून २५ टक्के निधी दिला जातो. चालू पावसाळी हंगामामध्ये म्हणजे जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नुकसानीबाहेर मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. 

मदतीसाठी अटी काय? शेतीपिके, फळपिके आणि वार्षिक लागवडीची पिके : कोरडवाहू क्षेत्रासाठी ८,५०० रुपये प्रतिहेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत कमीत कमी अनुज्ञेय मदत एक हजारापेक्षा कमी नसावी. आश्वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्र : प्रतिहेक्टर १७ हजार रुपये तर कमीत कमी अनुज्ञेय मदत दोन हजारांपेक्षा कमी नसावी. ३३ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक शेतीपिकांचे नुकसान झाल्यास दोन हेक्टर मर्यादेत मदत मिळेल. बहुवार्षिक पिके : प्रतिहेक्टरी २२,५०० रुपये मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरिता अनुज्ञेय असून, कमीत कमी २,५०० पेक्षा कमी असणार नाही. 

शेतजमिनीचे नुकसान झाल्यास किती मदत? शेतजमिनीवरील गाळ तीन इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित केल्यानंतर प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दरड कोसळणे, जमिनी खरडणे, खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून गेल्यास अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत अनुज्ञेय आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी