शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या भूगोल विषयाचे गुण देणार कसे ? राज्यस्तरीय समितीची बैठक होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 19:13 IST

या विषयाचे गुण कोणत्या आधारे द्यायचे याचा निर्णय अद्यापही झाला नाही़ 

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे निर्णय प्रलंबितच निकाल १० जूनपूर्वीच

- सुनील जोशी 

नांदेड : कोविड-२०१९ च्या लॉकडाऊनमुळे दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर स्थगित करण्यात आला होता़ राज्यस्तरीय तदर्थ समितीची बैठक लॉकडाऊनमुळे झालीचनसल्याने  या विषयाचे गुण कोणत्या आधारे द्यायचे याचा निर्णय अद्यापही झाला नाही़ 

१० वीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की? पाच विषयांच्या गुणांची सरासरी करून भूगोल विषयाचे गुण द्यायचे किंवा इतिहास विषयात जेवढे मार्क विद्यार्थ्यांना पडले तेवढेच मार्क भूगोलला देऊन सुवर्णमध्य साधायचा, हा विषय बोर्डाच्या अधिकाऱ्यांपुढे आहे़ यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बोर्डाची उच्चस्तरीय तदर्थ समिती आहे़ या समितीमध्ये राज्यात असलेल्या विविध मंडळांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, पालक, संस्थाचालक यांचा समावेश आहे़ समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे अपेक्षित होते़ मात्र लॉकडाऊनमुळे तसे झाले नाही़  दरम्यान, लॉकडाऊनमुळे दहावी परीक्षेचे पेपर अद्यापही संबंधित तपासणीस यांच्याकडे पडून आहेत़ विद्यार्थ्यांना अ‍ॅव्हरेज गुण दिले जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सचिव  औदुंबर उकीरडे यांनी सांगितले. सगळ्या विषयांचे गुण मिळून अ‍ॅव्हरेज गुण द्यायचे की, जेवढे इतिहासचे गुण मिळाले, तेवढे भूगोलमध्ये द्यायचे, याचा निर्णय घेतला जाईल.

निकाल १० जूनपूर्वीच1 १० जूनपूर्वी निकाल लावावेत, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. कालच बोर्डाच्या अध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिग झाली. मधल्या काळात काही ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक झाल्याने उत्तरपत्रिका आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. 

2 सध्या दहावीचे ३० टक्के आणि बारावीचे ७० टक्के काम झाले आहे.  आजपासून आम्ही प्रत्येक मॉडरेटरसोबत झुमवर बैठक घेणे सुरु केले आहे. पुढील पाच ते सात दिवसांत बऱ्याचशा उत्तरपत्रिका जमा होतील.  

3 जे हॉटझोनमध्ये राहतात, त्यांच्याकडील उत्तरपत्रिका आम्ही स्वत: जमा करून घेऊ अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिली. 

मॉडरेटरांना क्वारंटाईनची भीती  शासनाने आदेश काढल्याप्रमाणे उत्तरपत्रिका तपासणीचे काम होईल़ पुढे मॉडरेटरकडे पाठविल्या जातील व नंतर मॉडरेटर लातूर बोर्डाकडे उत्तरपत्रिका घेऊन जातील़ मात्र, १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार तर नाही ना अशी भीती मॉडरेटरमध्ये पसरली आहे.बोर्डानेच पुढाकार घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी उत्तरपत्रिका जमा करायला लावाव्यात व त्या घेण्यासाठी लातूरहूनच चारचाकी वाहन पाठवावे, जेणेकरुन ते सर्वांच्याच सोयीचे होईल, असा मतप्रवाह मॉडरेटरमध्ये सुरु आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी