शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात ३६ बाळांतपणे करायची कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:44 IST

कंत्राटी कर्मचारी म्हणून अवघ्या आठ, नऊ हजारांवर काम करीत आहोत़ अल्पसे वेतन तेही वेळेवर मिळत नाही़ आज २१ तारीख उजाडली. तरीही जुलैचे वेतन मिळालेले नाही़ दुसरीकडे उद्दिष्टावर उद्दिष्टे दिली जात आहेत़ कामाचा परफॉर्मन्स डिलीव्हरी केसेस किती केल्या त्यावर ठरविले जाते़ गावाची लोकसंख्या असो नसो वर्षाला ३६ बाळांतपणाचे उद्दिष्ट आहे़ ते पूर्ण करायचे कसे? असा उद्विग्न सवाल कंत्राटी कर्मचाऱ्याने उपस्थित केला़

ठळक मुद्देआरोग्यसेविकेचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कंत्राटी कर्मचारी म्हणून अवघ्या आठ, नऊ हजारांवर काम करीत आहोत़ अल्पसे वेतन तेही वेळेवर मिळत नाही़ आज २१ तारीख उजाडली. तरीही जुलैचे वेतन मिळालेले नाही़ दुसरीकडे उद्दिष्टावर उद्दिष्टे दिली जात आहेत़ कामाचा परफॉर्मन्स डिलीव्हरी केसेस किती केल्या त्यावर ठरविले जाते़ गावाची लोकसंख्या असो नसो वर्षाला ३६ बाळांतपणाचे उद्दिष्ट आहे़ ते पूर्ण करायचे कसे? असा उद्विग्न सवाल कंत्राटी कर्मचाऱ्याने उपस्थित केला़मंगळवारी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठवाडा विकास मंडळ यांच्या पुढाकाराने जिल्हा आरोग्य संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होत़ बैठकीला मराठवाडा विकास मंडळाचे डॉ़ अशोक बेलखोडे यांच्यासह डॉ़व्यंकटेश काब्दे, जिल्हा आरोग्य अधिकारी झिने, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंगणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ कदम आदींची उपस्थिती होती़या बैठकीत उपस्थित अधिकाºयांनी आरोग्य कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या़ यावेळी डॉ़ बेलखोडे यांनी कर्मचाºयांना बोलते केले़ आरोग्य विभागाचे काम करीत आहोत़ मात्र बोंडअळीच्या पाहणीसाठीही उशिरापर्यंत थांबावे लागते़ अशी व्यथा एका महिला परिचारिकेने मांडली़ मुख्यालयी थांबा असे आदेश सारखे बजावले जातात़ मात्र मुख्यालयी शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नाहीत़ मग आमच्या लेकरांनी शिकायचे नाही का ? असा सवाल ही यावेळी या परिचारिकेने केला़यावेळी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या महिला कर्मचाºयाने आपली व्यथा मांडली़ बाळांतपणाचे उद्दिष्टे आम्हाला देण्यात आले आहेत़ महिन्याला ३ बाळांतपण केलीच पाहिजेत, असे उद्दिष्ट आहे़ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही दारोदार फिरुन आमचे उपकेंद्र कसे चांगले आहे़ तेथे कशा सुविधा आहेत़ याची माहिती देत फिरतो़ मात्र आमच्या अडचणींकडे कुणीच पाहत नाही़ तुटपुंज्या वेतनावर काम करताना अनेक अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले़ दरम्यान, वाहनचालकांनी १०८ आणि १०२ या वाहनासंबंधीची गाºहाणी मांडली़ यातील अनेक वाहने नादुरुस्त आहेत़ मात्र त्यानंतरही स्वत:च्या जबाबदारीवर पेशंटला घेवून जावे लागते़ किरकोळ आजाराच्या रुग्णासाठीही गाड्याचा वापर होत असल्याची तक्रारही यावेळी त्यांनी केली़----संघटितपणे समस्या मांडामराठवाडा विकास मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हा आरोग्य संवाद बैठकीत डॉ़ अशोक बेलखोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ कर्मचाºयांच्या समस्या गंभीर आहेत याची जाण आहे़ मात्र केवळ पगारीसंबंधीच्या तक्रारी न करता इतर तक्रारीही कर्मचाºयानी संघटितपणे मांडाव्यात़ कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यEmployeeकर्मचारीWomenमहिला