नांदेड : येथील हॉटेल ‘तांडा’चे मालक सुरेश राठोड यांच्यावर हिंगोली गेट पुलावर गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. राठोड यांच्या पाठीमागून दुचाकीवरुनआलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला. ते घरातून स्कूटरवरुन हॉटेलच्या दिशेनं जात होते. राठोड यांच्या मांडीवर एक गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी अवस्थेत त्यांना शहरातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नांदेडमध्ये हॉटेल मालकावर मध्यरात्री गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 01:44 IST