शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिलेंडरच्या स्फोटाने संसाराची राखरांगोळी; जळालेली पुस्तके पाहून चिमुकल्यांना कोसळले रडू

By शिवराज बिचेवार | Updated: April 5, 2023 19:23 IST

पत्रे उडाली अन् कपड्यांसह पुस्तकेही जळाली, सुदैवाने जीवितहानी नाही

नांदेड- मिस्त्री काम करुन एक-एक रुपया जोडत पत्र्याचे घर उभे केले. पत्नीनेही संसाराला हातभार लागावा म्हणून कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरु केला. परंतु सिलेंडरच्या स्फोटाने होत्याचे नव्हते झाले. अख्खा घराच्या राख रांगोळीत चिमुकल्यांची पुस्तकेही जळाली. ही घटना बुधवारी नसरपूर येथे घडली. सुदैवाने यावेळी घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली.

जयभीम शिरसाठ हे मिस्त्री काम करतात. त्यांनी मजूरीतून एक-एक पैसा जोडत सहा महिन्यापूर्वी नसरतपूर येथे पत्र्याचे घर बांधले. तर त्यांची पत्नी अनिता शिरसाठ या गृहिणी आहेत. संसाराला हातभार लागावा म्हणून त्यांनी काही महिन्यापूर्वीच कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरु केला होता. भीमजयंती असल्याने साड्यांची विक्री होवून काही पैसे पदरात पडतील अशी अपेक्षा त्यांना होती. तसेच ब्युटी पार्लरचे साहित्यही घेतले होते. त्यांची दोन मुले १४ वर्षीय सौरभ आणि ११ वर्षीय रोहित हे दोघेही शाळेत जातात. बुधवारी जयभीम शिरसाठ हे कामावर गेले होते. तर दोन्ही मुले शाळेत गेली होती.

यावेळी अनिता या एकट्याच घरी होत्या. दुपारी गॅसवर स्वंयपाक करीत असताना शेजारी राहत असलेल्या मावशीचा त्यांना फोन आला. गॅसवर भाजी ठेवून त्या मावशीकडे गेल्या. त्यानंतर काही वेळातच सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज अख्या नसरतपूर मध्ये ऐकायला मिळाला. अनिता यांनी घराकडे धाव घेतली. समोरचे भयाण चित्र पाहून त्यांची पाचावर धारणच बसली. कारण घरावरची पत्रे उडून गेली होती. घरातील सर्व साहित्यही जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेतली. आग विझविली परंतु तोपर्यंत संसाराची राखरांगोळी झाली होती. अवघ्या काही क्षणात शिरसाठ कुटुंब उघड्यावर आले होते.

चिमुकल्यांना कोसळले रडूशाळेतून परत आलेल्या सौरभ आणि रोहित यांना स्फोटात जळालेली पुस्तके पाहून रडू कोसळले. आता आम्ही शाळेत कसे जाणार? असा केविलवाणा प्रश्न ते आपल्या आईला विचारत होते. तर अनिता शिरसाठ यांनाही अश्रृच्या धारा आवरता येत नव्हत्या.

सहा महिन्यापूर्वीच बांधले पत्र्याचे घरजयभीम शिरसाठ हे मिस्त्री काम करतात. त्याच्या मजूरीवरच ते मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा चालवितात. पत्नी अनिता यांनीही संसाराला मदत होईल म्हणून साड्यांचा व्यवसाय सुुरु केला होता. सहा महिन्यापूर्वीच डोक्यावर हक्काचे छत असावे म्हणून त्यांनी पत्र्याचे घर बांधले होते. परंतु आगीने होत्याचे नव्हते केले.

टॅग्स :Nandedनांदेडfireआग