शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये वाळू माफियांना दणका; 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारींविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:07 IST

गोदावरी काठी असलेल्या भणगी गावातील शेतामध्ये 34 शेतकऱ्यांनी  बिहारी  टोळ्यांना राहण्याची, खाण्याची  व्यवस्था केली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी मध्यरात्री नांदेड व मुदखेड तालुक्यात कारवाई करत 200 ब्रास वाळू  जप्त  केली होती. पावसाळा संपताच हजारो बिहारी टोळ्यांनी गोदावरी नदीचा ताबा घेतला होता

- अनुराग पोवळे नांदेड - जिल्ह्यात गोदावरी नदीतून नांदेड, मुदखेड, उमरी, लोहा, नायगाव आदी तालुक्यातून बिहारी टोळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात होता. खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी मध्यरात्री नांदेड व मुदखेड तालुक्यात कारवाई करत 200 ब्रास वाळू  जप्त  केली होती. या कारवाईत नांदेड तालुक्यातील भणगी येथील 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारी मजूरांविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात चोरी, पर्यावरण अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळू लिलाव न झाल्याने अवैध वाळू उपशाला ऊत आला  होता. कोरोना संकटासह इतर कारणांमुळे या वाळू माफियाकडे महसूल विभागाने दुर्लक्षच केले होते. या  वाळू माफियानी स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी यासह नायब तहसीलदारांशी संधान साधून आपले चांगभले केले. विशेष म्हणजे या  वाळू उपशासाठी पहिल्यांदाच बिहारी टोळ्यांचा वापर सुरु केला आहे. पावसाळा संपताच हजारो बिहारी टोळ्यांनी गोदावरी नदीचा ताबा घेतला होता. बांबू व तरफ्यांच्या सहायाने वाळू उपसा केला जात होता. 

     जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी 14 डिसेंबरच्या रात्री मुदखेड तालुक्यातील ब्राह्मणवाडा, नांदेड तालुक्यातील वांगी, नागापुर यासह भणगी येथे पोलीस फौजफाटा घेवून मोठी  कारवाई केली होती. तीन दिवस  ही  कारवाई सुरुच होती. गोदावरी काठी असलेल्या भणगी गावातील शेतामध्ये 34 शेतकऱ्यांनी  बिहारी  टोळ्यांना राहण्याची, खाण्याची  व्यवस्था केली होती. महसूल आणि पोलिसांनी या जागांचे संयुक्त पंचनामे केले. या ठिकाणाहून शेतकरी बिहारी टोळ्यांच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा करित होते. या प्रकरणी विष्णुपुरीचे मंडळ अधिकारी कोंडिबा नागरवाड यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारीविरुद्ध चोरी, पर्यावरण सरक्षण अधिनियम, महसूल अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा  दाखल  केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कुंडगीर हे करीत आहेत.    दरम्यान  जिल्ह्यात  यापूर्वी बिहारी टोळीविरुद्ध मुदखेड आणि  उमरी पोलिसांनी  गुन्हे दाखल केले आहेत.  पण दुसरीकडे  सोनखेड पोलीस ठाणे आणि  लोहा  तहसीलच्या सहकार्याने बेटसांगवी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या 12 बिहारी मजूराना समज देऊन सोडण्यात आले हेही विशेष. जिल्ह्यात बिहारी टोळ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात असताना सोनखेड पोलिसांनी या  बिहारीना कोणती समज दिली असावी याबाबत चर्चा सुरु आहे.

टॅग्स :sandवाळूNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड