शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च बोली धनज घाटाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:52 IST

राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या वाळू लिलावाच्या दोन फेऱ्यानंतर महसूल विभागाला २७ कोटी ९३ लाख ८७ हजार रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देमहसूल विभाग वाळू घाटांचे दोन लिलाव पूर्ण तिसऱ्या लिलाव प्रक्रियेची तयारी

नांदेड : राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या वाळू लिलावाच्या दोन फेऱ्यानंतर महसूल विभागाला २७ कोटी ९३ लाख ८७ हजार रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. यात नायगाव तालुक्यातील धनज वाळू घाटाला सर्वाधिक ५ कोटी ९१ लाख ३१ हजार ४० रुपये सर्वोच्च बोली मिळाली आहे.पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होणारी लिलाव प्रक्रिया जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यात सुरू झाली. जिल्ह्यात यावर्षी १२८ वाळू घाटांची लिलावासाठी पाहणी करण्यात आली होती. यापैकी ३१ वाळूघाटांना वाळू उपसा करण्याची परवानगी विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाली. पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी लिलाव प्रक्रिया तीन महिने रखडली. राष्ट्रीय हरित लवादाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विषयक मान्यता देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीकडून काढून घेतले होते.सदर परवानगीचे अधिकार राज्यस्तरीय समितीकडे देण्यात आले होते. त्यानंतर राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने मान्यता दिली. त्यानंतर २९ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया पहिल्या टप्प्यात करण्यात आली. दुसरा टप्पाही पूर्ण झाला आहे.यात नायगाव तालुक्यातील धनज या वाळू घाटाला ५ कोटी ५१ लाख ३१ हजार रुपये सर्वोच्च बोली मिळाली. या खालोखाल नायगाव तालुक्यातीलच मेळगाव घाटास ३ कोटी ५१ लाख ४२ हजार ५२४ रुपयांची बोली लावली. उमरी तालुक्यातील इरंडल या घाटाला ३ कोटी ३३ लाख ११ हजार, देगलूर तालुक्यातील शेळगाव २ या घाटास २ कोटी ६९ लाख ८८ हजार रुपये, उमरी तालुक्यातील महाटी घाटास १ कोटी ९५ लाख १ हजार रुपये, बिलोली तालुक्यातील बोळेगाव घाटास १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपये, उमरी तालुक्यातील कौडगाव घाटास २ कोटी १० लाख ८६ हजार रुपये, बिलोली तालुक्यातील सगरोळी घाटास १ कोटी ५४ लाख ९९ हजार रुपये, माचनूर घाटास १ कोटी ७३ लाख २७ हजार रुपये, कार्ला (बु.) ५७ लाख ४ हजार, गंजगाव-२, १ कोटी ४४ लाख ५ हजार रुपये, देगलूर तालुक्यातील तमलूर घाटास ९४ लाख १ हजार रुपये, सांगवी उमर ७१ लाख आणि मेदनकल्लूर घाटास ५५ लाख ५५ हजार ५५१ रुपये बोली मिळाली. या लिलाव प्रक्रियेतून २७ कोटी ९३ लाख ८७ हजार ३५९ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

  • वाळू लिलावातून मराठवाड्यात सर्वाधिक महसूल मिळविण्याचे काम नांदेड जिल्ह्याने केले आहे. मराठवाड्याची राजधानी मानल्या जाणाºया औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला केवळ १५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. परभणी जिल्ह्याला ६० कोटी ५ लाख रुपये महसूल मिळाला आहे. दुसरीकडे हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात लिलाव प्रक्रिया सुरूच झाली नाही. जालना जिल्ह्यात लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. पहिल्या दोन लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक महसूल देणारा बिलोली तालुका मागे पडला असून नायगाव तालुका अव्वलस्थानी पोहोचला आहे.
टॅग्स :Nandedनांदेडsandवाळूgodavariगोदावरी