शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

हळदीला भाव नसल्याने शेतकरी झाला हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:11 IST

हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर तालुका : अपुऱ्या पावसाने उत्पादनही घटलेउत्पादन खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ लागेना

श्रीक्षेत्र माहूर : हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने एकरी उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बºयापैकी पाऊस झाला तर एकरी किमान १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते़ मात्र यावर्षी आॅगस्ट २०१८ मध्ये आलेल्या महापुरानंतर वरूणराजाने अवकृपा केल्याने शेतक-यांच्या शेतातील पिकांच्या उत्पादनावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला असून हळदीचे उत्पादन निम्म्यावरच आले आहे. त्यातच भाव कमी मिळाल्याने बळीराजाचे वार्षिक आर्थिक नियोजन बिघडले असून बळीराजात कहीं खुशी कहीं गम असे वातावरण दिसून येत आहे.माहूर तालुक्यात हळदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. तालुक्यातील ४१५ हेक्टर क्षेत्रांवर हळद पिकाची लागवड केली आहे. एका एकरासाठी जवळपास ८ ते १० क्विंटल हळदीचे बियाणे लागते. तसेच प्रतिएकरासाठी बियाणापासून ते लागवडीपर्यंतचा उत्पादन खर्च विचारात घेतला तर सध्या बाजारपेठेमध्ये हळदीला मिळत असलेले भाव परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. गतवर्षी १५ ते २० क्विंटल उतारा असलेले हळदीचे उत्पन्न यावर्षी एकरी १० ते १५ क्विंटल एवढाच उतारा येत आहे.पाण्याच्या उपलब्धतेचा अभाव याचा देखील हळद उत्पादनावर परिणाम झाला आहे. ६ ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून उत्पादनखर्च व मिळालेल्या उत्पन्नाचा ताळमेळ लावताना बळीराजाच्या नाकीनऊ येत आहेत. शेतातील मिळणा-या उत्पादनातून आपले वार्षिक आर्थिक नियोजन करण्याच्या अपेक्षा बाळगून असलेल्या शेतक-यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी हळदीचे पीक हे हमी उत्पन देणारे पीक असल्यानेच प्रतिवर्षी हळदीचे लागवड क्षेत्र वाढत असल्याचे दिसत आहे. हळद उत्पादक शेतकºयांच्या अडचणीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.

यावर्षी अत्यल्प पावसाने हळद पिकाचे उत्पन्न घटले असून जलस्त्रोत आटल्यामुळे पाणी देण्याससुद्धा पुरेसे पाणी बसल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न निम्म्याने घटले असून सुरुवातीच्या काळात चांगला भाव होता. मात्र नंतरच्या काळात बाजारात आवक वाढल्यानंतर भाव पाडल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे-विनायक पुंडलिकराव कुटे, हळद उत्पादक शेतकरी, सायफळ

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीMarketबाजारMONEYपैसा