शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

नांदेड जिल्हयातील दमदार पाऊस; कुरुळा मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 14:22 IST

सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात एकूण  २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे

नांदेड : जिल्ह्यातील मुखेड,देगलूर, किनवट, कंधार तालुक्यात रविवारी दमदार पाऊस झाला. कंधारमधील कुरुळा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

सर्वाधिक २५.५० मिमी सरासरी  पाऊस देगलूर तालुक्यात झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. यात कंधार तालुक्यातील कुरूळा महसुल मंडळात ८० मिलीमीटर पाऊस  झाला आहे.

किनवट तालूक्यातील मांडवी येथेही जोरदार पाऊस झाला असून तिथे ६४ मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टीच्या काठावर नोंद झाली आहे. शहापूर ४३, शिवणी ३५, जांब ३५, माळेगाव ३२, येवती ३०, देगलूर २८, किनी २८, सगरोळी २८, तामसा २४, मिरखेल २१, तर मातुळ मंडळात २० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर १२ महसुली मंडळात १० ते २० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये जाहूर १८, खानापूर १८, माळाकोळी १६, आदमपूर १६, उस्माननगर १५, मुखेड १२, हदगाव १२, निवघा १२, आष्टी १२, लोहा ११, हानेगाव ११

तर हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात १० मिली मीटर ईतका पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण  २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे. तर अन्य ६५ मंडळात पावसाने उघडीप दिली होती. सोमवारी सकाळपर्यंत जिल्हयात सरासरी ३१३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ३७.२९ टक्के इतका आहे.

तालुक्यात आता सर्वाधिक पावसाची नोंद कुरूळा झाली आहे.एकूण कुरूळा ३०४ मि.मी. ,उस्माननगर २९३ ,फुलवळ २६१ ,कंधार २३७ ,पेठवडज २१७ व सर्वात कमी बारूळ २०३ मि.मी.झाली आहे.कुरूळा पावसाचे एकमेव कमी कालावधीत त्रिशतक मि.मी.पार करणारे ठरले. अतिवृष्टीमुळे शिवारात जिकडे तिकडे दलदल तयार झाली. सखल भागात सर्वत्र पाणी साचले. नदी ,नाले, तलावात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.विशेष म्हणजे गावालगत ऐतिहासिक हेमाडपंथी भवानी मंदिर (शिव पार्वती) आहे.मंदिरा जवळ तलाव आहे. यामध्ये असलेली गाळ काढल्याधे तलावाची खोली जास्त झाली आहे.तरी रात्री झालेल्या पावसामुळे तलाव तुडुंब भरला.

शेत शिवारात पाणी अधिक झाल्याने आता शेती कामाचा खोळंबा झाला आहे.पीके पाण्याखाली आली आहेत.त्यामुळे पाण्याचा वाफसा कधी होईल.असा प्रश्न निर्माण झाला आहे.दि.२० जूलै रोजी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.त्यामुळे सोयाबीन पीकाची पाने अगोदरच पिवळी पडत होती.औषधी फवारणी करून हिरवी पाने करण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते.त्याला मोठी खिळ बसली आहे.

 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड